Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeमराठवाडालातूरअमित देशमुख यांच्या विरोधातील भाजपची खेळी फसली !

अमित देशमुख यांच्या विरोधातील भाजपची खेळी फसली !


लातूर : माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे चिरंजीव लातूरचे आमदार अमित देशमुख यांच्याविरोधात तगडा उमेदवार देण्याचा भाजपचा डाव होता. त्यासाठी काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुन डॉ. अर्चना पाटील यांना उतरवण्याची तयारी सुरू केली होती. मात्र चाकूरकर भाजपच्या गळाला लागले नाही. त्यामुळे भाजपची खेळी फसली.

भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे बरेच नेते फोडून आपल्या तंबूत घेतले. त्यांना उमेदवारी दिली. यामुळे भाजपात सध्या बंडाळी माजलेली आहे. तर लातूरमधून अमित देशमुखांच्या विरोधात भाजपाकडे तगडा उमेदवार नाही. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुन डॉ. अर्चना पाटील यांना उतरवण्याची तयारी सुरू केली होती. त्यासाठी भाजपाने शिवराज पाटील चाकूरकर यांची मनधरणीही केली. मात्र, चाकूरकर यांनी काँग्रेस सोडणार नसल्याचे सांगितले आहे. “मरे पर्यंत मी आणि कुटुंबातील कुणीही काँग्रेस सोडणार नाही,” असं चाकूरकर म्हणाले. त्यामुळे त्यांनी अखेर बुधवारी शैलेश लाहोटी यांना उमेदवारी जाहीर केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments