Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमराठवाडालातूरराज्यातील पहिल्या दिव्यांगाच्या आयटीआयला मंत्रीमंडळाची मंजूरी

राज्यातील पहिल्या दिव्यांगाच्या आयटीआयला मंत्रीमंडळाची मंजूरी

पालकमंत्री निलंगेकरांच्या पुढाकारातून राज्यातील पहिल्या दिव्यांगाच्या आयटीआयला मंत्रीमंडळाची मंजूरी
राज्यातील दिव्यांगाना स्वतःच्या पायावर उभा करुन त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकार ठोस पाऊले उचलत आहे. याचा एक भाग म्हणून राज्याचे कौशल्य विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पुढाकारातून राज्यातील पहिले दिव्यांगाचे आयटीआय उभारले जात आहे. या प्रस्तावाला आज सोमवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे.

राज्यातील दिव्यांगाना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगिण विकास करण्याकरीता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकार बांधील आहे. त्या अनुषंगाने ठोस पाऊले उचलत सर्व विभागांना दिव्यांगाच्या विकासासाठी पाच टक्के निधी खर्च करण्याचा आदेश ही देण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्यातील दिव्यांगाची नोंद ग्रामपंचायत स्तरावर करण्यात येत असून त्यांना विविध सोयी सुविधाही उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पुढाकारातून लातूर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तीची नोंद करण्यात आलेली असून अशी नोंद करणारा लातूर हा राज्यातील पहिला जिल्हा आहे. त्याचबरोबर दिव्यांगासाठी सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा व विविध साहित्य उपकरणे उपलब्ध करुन देण्यात येत आहे. दिव्यांगाचा सर्वांगिण विकास व्हावा व त्याचा आर्थिक स्तरही उंचावला जावा या करीता राज्याचे कौशल्य विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री निलंगेकर यांच्या पुढाकारातून दिव्यांगाना कौशल्य शिक्षण प्राप्त करुन देण्यासाठी दिव्यांगाचे आयटीआय उभारले जात आहे.

राज्यातील हे दिव्यांगाचे आयटीआय पहिले असणार आहे. याबाबत पालकमंत्री निलंगेकर यांनी पुढाकार घेतलेला होता. या आयटीआयला आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली असून त्यासाठी आवश्यक असणारा निधीही मंजूर झालेला आहे. या दिव्यांगाच्या आयटीआयमुळे दिव्यांगाना कौशल्यावर आधारीत शिक्षण मिळून ते आता मुख्य प्रवाहात येणार आहेत. या आयटीआयच्या मंजूरीमुळे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments