Friday, March 29, 2024
Homeमराठवाडालातूरदारूड्या बापाने घोटला चिमुकलीचा गळा घोटला

दारूड्या बापाने घोटला चिमुकलीचा गळा घोटला

latur,nitur,maharashtra,father,strangled, daughter,chimukaliनिटूर : निलंगा येथे दारूड्या बापानेच एक वर्षाच्या पोटच्या चिमुकलीचा गळा घोटून मारल्याने निटूर व परीसरामध्ये या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे पोटच्या मुलीचाच तेही एक वर्षाच्या चिमुकलीचा गळा घोटल्याने निटूर परीसरामध्ये या घटनेमुळे संताप ही व्यक्त होत आहे .
याबाबात अधिक माहीती अशी की, निलंगा तालूक्यातील निटूर गावचाच शिवाजी लाळे वय 32 वर्ष यांने त्याच्या पोटच्या मुलीचा गळा आवळून जीव घेतला सदरील घटना 1 ऑगस्ट रोजी सायं सात च्या दरम्यान घडाली या घटनेमुळे निटूर मध्ये खळबळ उडाली असून गावात संताप व्यक्त होत आहे .
संशयीत आरोपी शिवाजी लाळे हा दारूच्या अधीन आहे यापूर्वी तीन ते चार वर्षापूर्वी त्यांच्या पहील्या पत्नीने जाळून घेवून आत्महत्या केली होती त्यानंतर दुसरा विवाह केल्यानंतर वर्षभरापूर्वी एक मुलगी झाली होती त्याच मुलीचा गळा घोटून जीव घेतला आहे .
दरम्यान घटनेची माहीती मिळताच शिरूर अनंतपाळ पो. स्टे.चे पोलिस निरीक्षक एन. बी. इंद्राळे व त्यांच्या सहका-याने घटनास्थळी भेट देवून मयत चिमुकलीला पाहण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र निटूर येथे भेट दिली.

सदरील मयत बाळाचे अद्याप शवविच्छेदन झाले नसून उद्या 2 ऑगस्ट रोजी करण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
संशयीत आरोपी शिवाजी लाळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनेची चौकशी पोलिस करत आहेत.
सदरील घटनेचा गुन्हा दाखल झाला असून राञी उशिरा आरोपीला गजाआड करण्‍यात आले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments