Friday, March 29, 2024
Homeमराठवाडालातूरमाजी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी आईला दिल्या ‘वाढदिवसाच्या’ आगळ्यावेगळ्या शुभेच्छा!

माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी आईला दिल्या ‘वाढदिवसाच्या’ आगळ्यावेगळ्या शुभेच्छा!

आज माझी आई परम पूज्यनिय आयुष्यमती वत्सला बळीराम गायकवाड ६ फेब्रुवारी २०२१ ला वयाची ८१ वर्ष पूर्ण करून ८२ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. माझ्या आई बद्दल आज थोडंसं लिहायचं ठरवलं आहे.

मला जस कळत तस माझ्या आई नी कधीच कुठल्या देवाची पूजा केले नाही की कधी पाया पडली नाही त्याचे मुख्य कारण माझे पूजनीय जन्म दाते दादा हे कधीच कुठल्या देवाची पूजा केले नाहीत म्हणून कदाचित माझी आई अशी आहे. आम्ही तीन भाऊ आणि चार बहिणी असा परिवार मोठी बहिण लीलाबाई, मोठे बंधू अनिलकुमार अण्णा, ललिता, पुष्पलता, मीना, विजयकुमार आणि मी असा आमचा परिवार.दादा सांगायचे तुमची आई बहिणींची घरी औरद ला आली होती आणि तिथे दादांनी पाहिले आणि लग्न करून घेतले. दादानी इंग्रज सरकार, निजाम सरकार, आणि भारत सरकार अशा सरकार चे नाने त्यांनी वापरली दादांचे लग्न मात्र त्या निजामाच्या काळात झाले. दादांचे शिक्षण हैद्राबाद ला झाले आणि दादा हे त्यांच्या कासारशिरसी या जन्म गावाचे दलीत समाजातील पाहिले विद्यार्थी म्हणून हैद्राबाद ला शिक्षण घेऊन आले होते. भारत स्वतंत्र झाल्यावर भाषावार प्रांरचनेच्या नुसार दादा हे मराठी भाषिक असल्याने त्यांची बदली ही महाराष्ट्र मधे झाली.शिक्षक म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यात देवगाव (बु ) तालुका परंडा ला पहिली नियुक्ती झाली. माझी आई मात्र अशिक्षित शिक्षणाचा कसलाही गंध नसलेली पण गुरुजींना गावाकडे मास्तर म्हणतात नी मास्तरांच्या पत्नीला मास्तरीन बाई म्हणतात.

माझ्या आई चे माहेर हे ऐतेहासिक घराण्या चे होते.तिचे वंशज विजापूर च्या आदिलशहा च्या दरबारातील सैन्य मध्ये मुख्य पदावर असलेले आणि भीमा कोरेगाव च्या लढाई मध्ये इंग्रज सैन्या मध्ये मोठ्या पदावर असलेल्या आणि .भीमा कोेरेगाव युद्ध मधे इंग्रज सैन्यात महार सैनिकांनी पेशव्या चा पराभव केला म्हणून त्या सैन्याना इंग्रजानी तुळजापूर ला जमीन बक्षिस दिली होती.त्या काळात तुळजाभवानी मंदिर मध्ये प्रवेश संदर्भ मंदिर पुज्यारी आणि त्यांच्यात संघर्ष झाला आणि त्या नंतर ते कुटुंब वेगवेगळ्या ठिकाणी गेले कर्नाटक मध्ये तुगाव (हलसी) ला जे गेले ते तुळजापुरे म्हणजे माझ्या आई चे माहेर सारजा आणि केराबा तुळजापूरे यांची सुकन्या माझी आई. त्या निजाम काळात माझी आजी सारजा ही अतिशय रुबाबात राहणारी होती. त्या काळी ती स्वतः घोड्यावर बसून फिरायची गावात आणि त्या परिसरात माझ्या आजी चा चांगलाच दरारा होता.माझी आई सुखी आणि चांगल्या कुटुंबातील होती. आई चे लग्न झाले आणि कासारशिरसी ला आली.दादांचे कुटुंब हे मोठे कुटुंब होते.दादांना सात भाऊ आणि एक बहिण असा मोठे कुटुंब होते.

दादा सांगायचं तुमच्या आई नी खूप सोसलं आहे.पण कधीच कसली तक्रार केली नाही.दादा लग्ना नंतर पहिल्यांदा जेव्हा सासर वाडीला म्हणजे तुगाव ला निघाले तेव्हा पावसाळा होता आणि तेव्हा वाहनाची कुठलीच व्यवस्था नव्हती कासार सिरसी वरून तुगाव ला पाई चालत गेले जवळपास ५० ते ५५ किलोमिटर असेल तेव्हा रस्ते ही पाऊल वाट असायची. हलसी आणि तुगाव च्या मध्ये मांजरा नदी वाहते आणि त्या काळात पाऊस खुप मोठ्या प्रमाणात पडायचे.दादा निघाले आणि नदीला पुर आलेला अगदी समुद्रा सारखं स्वरूप पाणी हलसी गावात घुसलेले दादा नंबर एकचे पोहणारे आणि पहिलवान होते दादांनी नदीत उडी मारली आणि तेवढ्या मोठ्या पुराला पार करून हलसी तुगाव गाठले. सगळे गावकरी नको नको म्हणताना सुद्धा गेले.त्यांचा स्वतःचा आत्मविश्वास होता म्हणून नदी पार करून गेले.तेव्हा दळण वळणाची साधने नव्हती आणि दादांची पाहिलं नियुक्ती खूप दूर झालेली. माझ्या आई ला घेऊन जाताना तिच्या आयुष्यातला हा लांबचा पहिलाच प्रवास होता. लातूर हून डुग डुग चालणारी रेल्वे होती. त्या रेल्वे नी बार्शी पर्यंत आणि तिथून दादांनी बैलगाडी ची सोय करून देवगाव बु. ला घेऊन गेले. त्या गावात गेल्यावर गावच्या पाटलांनी वाड्यात रहावा असी दादांना विनंती केली पण दादांनी ते ऐकले नाहीत तिथल्या दलीत वस्तीत लाकडाचे एक झोपडे ( कुड घेऊन बनवलेलं घर) स्वतः बनवले आणि तिथे राहिले.

सुखी जीवन जगलेली माझी आई दादांच्या नवीन संसारात आहे त्या परिस्थतीत कसलीही तक्रार न करता संसार करू लागली.तो काळ हा अत्यंत कठीण काळ होता.त्या काळात दादाचा पेहरावा राहणीमान ही परम पूजनीय बाबासाहेब यांचा आदर्श घेऊन टॉप पेहरावा दादा करीत असत. मसराई चे धोतर आणि ग्याब्रेडीन चा कोट असा ड्रेस दादा वापरायचे. हैद्राबाद ला बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत सहवासात दादांनी सामाजिक काम केले होते बाबासाहेब यांच्या विचारांचा पगडा दादांनवर खूप होता.माझी आई निरक्षर जरी असली तरीही ती मास्तरिन बाई होती. कुभेफळ ला असताना माझी मोठी बहीण लीलाबाई मोठे बंधू अण्णा अनिलकुमार ललिता पुष्पा असे होते माझा जन्म झाला आणि दादाची बदली अंबुलगा विश्वनाथ ला झाली.पण कुंबेफळ ला दादा आईं असताना चे काही प्रसंग मला दादांनी सांगितलेले आठवतात.

दादा जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक होते आणि अण्णा दादांच्या खूप लाडके होते. दादा शाळेत गेले की अण्णा पण सोबत जायचे आणि दादा जे शिकवतात ते अण्णा ध्यान देऊन लक्षात ठेवत असत. अण्णा लहान पणापासून खूप हुशार आणि हट्टी होते.एकदा दादा मीटिंग साठी तालुक्या ला निघाले होते आणि घरी आण्णा असताना एक धर्मा भोसले नावाचा माणूस आला आणि अण्णा जवळ रेडिओ होता तो माणूस अण्णा ला म्हणानाला ” अरे नीट लाव रेडिओ ” अण्णा नी हे ऐकले आणि रेडिओ टाकून नीट दादा गेल्याच्या रस्त्याला पळ काढला.पण दादा दुसऱ्याच रस्त्यांनी गेले होते ते माझ्या मोठ्या बहिणीला माहीत होते ती पळत जाऊन दादांना घरी घेऊ आली आणि अण्णा ला पण दादांनी घरी घेऊन आले आणि दादांनी अण्णा ला विचारले का पळत निघालो होतो. अण्णा म्हणाले या मामांनी मला रेडिओ नीट लाव महून ओरडले ते सांगायला येत होतो. दादा अण्णा ला तेव्हापासून याहो आणि जाहो बोलायचे ते दादांनी शेवटपर्यंत असेच बोलले.

त्या गावच्या अनेक प्रसंग मला दादांनी सांगितले आहेत. दादाची बदली निलंगा तालुक्यातील अंबुलगा ( विश्वनाथ) येथे झाली. तेव्हा मी जन्मेला बाळ होतो.जसे कुंभेफळ ला आपल्याच वस्तीत राहिले तसेच अंबुलग्यात पण एकाच्या घरी किरायाने राहत होते नंतर गावच्या सरपंच ग्रामसेवक नी एक जागा दिली आणि तिथं दादांनी स्वतः दगडी बांधकाम करून स्वतःच घर बांधले.आम्ही सगळे हळू हळू मोठे होत होतो. लीलाबाई, अण्णा,  ललिताबाई, पुष्पाताई, मी आणि विजय आणि मीना असे अंबुलग्याला लहानाचे मोठे झालो.मला चांगले आठवत माझ्या आईनी आम्हा बहिण भावानं कधीच मारले नाही. दादांचा संसार आहे त्यात समाधानी आणि सुखी राहण्याचा आईचा स्वभाव. घरी कोणीही पाहुणा आला तर त्याला जेवण घातल्या शिवाय जाऊच देत नाही आज आई ८२ व्या वर्षात पदार्पण करीत आहे आज ही ती घरी आलेल्या पाहुण्यांना जेवण चहा पाणी केल्याशिवाय जाऊच देत नाही हे संस्कार माझ्या आईचे आहेत.

आई आपल्या लेकरांची काळजी कशी घ्यायची याचा एक प्रसंग मला कायम माझ्या लक्षात आहे. मी पाचवीला होतो चौथी ची बोर्ड परीक्षा मी बोर्डात पहिला आलो होतो आणि पाचवीत गेलो होतो. आमचे घर शाळेच्या जवळच होते.घरून शाळेच्या वरांड्यात बसलेलं आमच्या घरून सरळ दिसायचे.एके दिवशी चारपाच मुले माझ्यापेक्षा मोठी असलेले पत्याचा डाव खेळत बसले होते.आणि मी खेळत नव्हतो पण बाजूला बसलो होतो.मी बाजूला बसलेलं आई नी पाहिली आणि आई शाळेत येऊन माझा पाठलाग करून मला मारली.पत्ते खेळतोय का म्हणून.बाजूला सुद्धा बसायचं नाही आणि दिली मला दोन थोबाडीत. तेव्हा पासून मला आई नी कधीच मारली नाही पण मी ही कधीच कुठल्या वाईट संगतीच्या माणसा सोबत तेव्हा पासुन बसलो नाही. आईची माया आईच प्रेम हे शब्दात सांगताच येत नाही. आम्ही कितीही मोठे झालो माझे मोठे बंधू अण्णा अनिलकुमार आज सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव आहेत पण आई आज ही अण्णा ला विचारते अनिल खर्चायला पैसे आहेत की देऊ. मी लातूरचा खासदार म्हणून निवडून आलो आणि दिल्ही ला गेलो पण अधिवेशन काळात लातूर ला घरी आलो आणि दिल्ही ला निघालो की आई मला बोलवायची आणि मला पैसे द्यायची मी सांगत असे मला आता पगार आहे पैसे आहेत तरी ही ती दयाची तिच्या समाधना साठी मी पैसे घेत असे सांगायचं तात्पर्य असे की आई ला आपले मुले मोठे झालेत असे कधीच वाटत नाही ती प्रचंड प्रेम करते.

मी खासदार असताना असो को आता नसताना रात्री उशिरा घरी आलो की आई स्वतःच्या हातानी स्वैपाक करून मला जेवायला देते त्या शिवाय तिला समाधान वाटतच नाही ही आईची माया आहे प्रेम आहे. माझी आई दवाखान्याला खूप घाबरते एकदा डॉक्टर कडे घेऊन गेलो होतो मी स्वतः खूप आग्रह केल्यावर तयार झाली होती ती तिची पहिलीच वेळ होती दवाखान्यात जायची डॉक्टर म्हणाले ई सी जी करून बघू या आई ला त्या रुमकडे घेऊन गेलो आई नी त्या रूम मध्ये वायर बघितली आणि अक्षरशः तिथून पळत जाऊन गाडीत रडत बसली घाबरु तेव्हा पासून आज पर्यंत दावाखान्यात गेलीच नाही.

८२ वर्षात पदार्पण करीत आहे पण डोळे तपासून नंबर काढायला आज ही तयार होत नाही मग मी शेवटी घरी  डोळे तपासून नंबर काढायचे डॉक्टर आणले तरीही आई म्हणाली मला दिसते. डॉक्टर ही प्रयत्न केले पण नंबर काही निघाला नाही आई म्हणाली मला ठळक दिसते पण डोके दुखते.आई ची एकाच डॉक्टरला मान्यता आहे तुळजाई हॉस्पिटल चे डॉक्टर महेंद्र सोनवणे या डॉक्टर ला मात्र आई घाबरत नाही कारण आईला वाटते आई म्हणेल तशा बारीक गोळ्या देतात आणि मला सोनवणे डॉक्टर चाच गुण येतो म्हणते .आम्ही सगळेच तिच्या मना नुसारच वागतो.कधी कधी औषध गोळ्या घ्यायला तयार होत नसते तेव्हा मात्र मला अण्णा ला सांगावे लागते तुम्ही आईला कॉल करून औषध गोळ्या घ्यायला सांगा मग आई ऐकते अण्णा नी सांगितले की तयार होते.पण आता आई दादा गेल्या पासून ती थकली आहे.तिला वाटत मी इथेच राहावं मी असले की ती सकाळी मला फोन करते ९ वाजता ये  जेवण करायला दुपारी ३ ला परत फोन करते ये जेवण करायला परत रात्री ८ ला कॉल करते ये जेवण करायला आई सोबत मी तिन्ही वेळा जेवण करतो तिला एकटीला जेवण करू वाटत नाही आणि ती करत पण नाही .तिला घरात मानस असले की बर वाटत.बर आहे माझी एक बहिण पुष्पाताई लातूर ला आहे .ती आईची सेवा आणि काळजी करते तिला बोलायला कोणीतरी असले पाहिजे.विजयकुमार ची पत्नी पल्लवी आईची सुन  काळजी घेते वेळेवर औषध पाणी करते पण एक गोष्ट मी नेहमी नोट केली आई जेवण झाले की दररोज न चुकता पल्लवी जेवण करून घे हे मात्र न चुकता बोलते.पुष्पा ताई ला त्रास नको रोज यायचा म्हणते तिला येऊ नको म्हणते आणि खरच पुष्पाताई एखाद्या दिवशी नाही आली तर पुष्पा आलीच नाही म्हणत बसते.आई सोबत पुष्पाताई असल्यामुळे मला तिचा खूप मोठा आधार वाटतो.

मी मुंबई दिल्ली गेलो की तिला वाटत खूप दिवस झाले जाऊन आणि मी फोन केला की लवकर ये म्हणते.तिला वाटत रोज तिच्या लेकरानी बोलाव फोन करावं..रोज हातात फोन घेऊन बसते.पहिला कॉल ललूबाई चा लगेच मीना चा तिचा झाला की संघु चा हे रोज चे कॉल आलेच पाहिजेत एकाच पण नाही आला तर का आला नाही म्हणत बसते.अण्णा ला आई खूप मिस करते आणि स्वतःची समजूत काढून घेते कामात खूप बिझी असेल म्हणून अनिल चा फोन आला नाही म्हणते.अश्विनी ची आईला खूप सवय होती ती तिला पण खूप मिस करते तिला नेहमी वाटते लग्न झाल्यापासून ती लातूर ला आलीच नाही वाटत.सगळे म्हणाले ती येऊन गेली तिला ते खरंच वाटत नाही मग मी म्हणतो हो ती आलीच नाही मग तिला बरं वाटत.आज पण मला जेवण करताना म्हणाली अश्विनी लग्न झाल्यापासून आलीच नाही. आई ला फक्त आणि फक्त परिवारातील सर्व सदस्यांचा गोतावळा हवा आहे.

काही दिवांपूर्वीच अण्णा वहिनी आणि आमच्या सूना लेकर आले होते आई खुप खुश आणि आनंदी झाली. जयश्री वहिनी आणि माझी पत्नी विशाखा या दोघीं आईच्या सुना नी आई ला करमनुक व्हावी म्हणून तिच्या बेडरूम मध्ये टी व्ही बसवण्या ची सूचना केली .ती बसवून दिली रोज टी. व्ही पहातां आई बोलते त्या जयान आणि विशाखा न बसून दिली. ती आता बघते.मी अगोदर बसून देतो म्हणालो तर मला नको म्हणाली पण वाहिनी चे आभार तुमचे आई नी ऐकलं. खर तर छोट्या छोट्या गोष्टीच सुख दडलेल असते फक्त ते ओळखता आल पाहीजे.

खूप काही आहे लीहण्यासारख पण आई मला नेहमी बोलते आरे शेतात तुमच्या दादा च स्मारक बांधलाय पिढ्यान् पिढ्या ते तसच राहील पाहिजे तिथलं शेत तुम्ही कधीच विकू नका मी म्हणालो आई आम्ही काय आमच्या नंतर ही ते कोणीच विकू शकणार नाहीत.. दादाचं मंदिर आहे तिथं तू काळजी करू नकोस म्हणलो मग आई म्हणाली बघ विकल तर बाप विकल्या सारखं होईल.खरंच आई बरोबर बोलतिया खूप कष्टातून दादांनी हे विश्व उभे केले आहे माझी आई नी कधीच स्वतःचा वाढदिवस करू दिला नाही आणि तिला माहिती पण नाही कधी असतो तिचा वाढ दिवस … आज मात्र मी तिला सरप्राईज देतोय .. आई तुला वाढ दिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..

तुझाच

डॉ सुनील बळिराम गायकवाड

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments