Friday, March 29, 2024
Homeमराठवाडालातूरचाकूर येथे भरदिवसा चोरी घर फोडले, 1 लाख 44 हजाराचा एैवज पळवला

चाकूर येथे भरदिवसा चोरी घर फोडले, 1 लाख 44 हजाराचा एैवज पळवला

theft stolen thief,chakur,gaikwad,laturचाकूर शहरातील लेक्चर कॉलनी भागातील घर अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा फोडले. सुमारे 1 लाख 44 हजार रुपयांचा एैवज पळवण्यात आला. या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर चोरी प्रकरणी शिवराज दिनया स्वामी राहणार- लेक्चर कॉलनी, साई नंदनवन रोड, चाकूर. यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. फिर्यादी यांच्या घरी कोणी नसताना अज्ञात चोरट्यांनी 9 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घराच्या मुख्य दाराचे कुलूप लोखंडी रॉडने तोडून घरात प्रवेश केला. घरातील लाकडी कपाटातील सुमारे 1 लाख 44 हजार रुपयांचा ऐवज पळवण्यात आला. त्यामध्ये 4 तोळ्याचे एक मोठे गंठण, 2 तोळ्याचे एक छोटे गंठण, कानातले 5 ग्रॅमचे एक आणि 3 ग्रॅमचे एक तसेच 1 ग्रॅमचे सोन्याचे मणी यांचा समावेश होता.

सायंकाळी घरी आल्यानंतर घरातील चोरीचा प्रकार फिर्यादींच्या लक्षात आला. या प्रकरणी रात्री पावने बारा वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments