Friday, April 19, 2024
Homeमराठवाडालातूरलातूरच्या पालकमंत्रांचे दिव्यांगांना मोफत सहाय्यक उपकरनांचे वाटप

लातूरच्या पालकमंत्रांचे दिव्यांगांना मोफत सहाय्यक उपकरनांचे वाटप

लातूर: निलंगा मतदार संघातील दिव्यांगाना स्वाभिमानाने जगता याव, सहाय्यक उपकरणाच उपयोग करून स्वतः च काम स्वत:ला करणे शक्य व्हावे यासाठी मोफत तपासणी करुन जे आवश्यक व गरजेचे आहे ते सहाय्यक उपकरणे सातशे चाळीस दिव्यांगाना देण्यात आले. या शिबीर ठिकाणी दि .16/8/2019 भा.ज.प.युवा नेते अरविंद निलंगेकर यांनी भेट घेऊन दिव्यांगाशी चर्चा केली. भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती, मुंबई व नामदेव कदम यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. या शिबीरात ट्राय सायकल99, व्हिलचेअर80, कँलिपर60, कानाची मशीन100, कुबडी वाकर 330 वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नगराध्यक्ष बाळासाहेब शिगांडे, रमेश सातपुते ,न.प.सदस्य  शरद पेठकर व अरविंद चव्हाण,  भा.ज.पा.युवा मोर्चेचे पदाधिकारी ने प्रयत्न केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments