होम महाराष्ट्र मराठवाडा लातुर मध्ये प्रंचड मताधिक्याने जिंकुन राज्यात एक नवीन विजयाचा पॅटर्न करु: निंलगेकर

लातुर मध्ये प्रंचड मताधिक्याने जिंकुन राज्यात एक नवीन विजयाचा पॅटर्न करु: निंलगेकर

87
0

Sambhaji Patil Nilangekar, Latur, Latur Lok Sabha, BJP, Nilangekar, संभाजीराव पाटील निंलगेकर, निंलगेकर

लोकसभा निवडणुकीनिमित्त आज लातूर, उदगीर येथील विशाल मंगल कार्यलयात भाजपा पदाधिकारी, बुथ प्रमुख व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. यास नामदार संभाजीराव पाटील निंलगेकर हे उपस्थित होते यावेळी नामदार भैया म्हणाले की या निवडणुकीनिमित्त सर्वांनी जोमाने कामाला लागून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवण्यासाठी मतदारसंघात स्पर्धा करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

तसेच आपले महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री सुधाकर शृंगारे हे लातुर लोकसभेची निवडणूक जिंकणार हे प्रत्येक जण विश्वासाने सांगत असले तरी, फक्त निवडणूक जिंकायचीच नाही तर विक्रमी मताधिक्याने जिंकून नवा लातूर पॅटर्न घडवायचा आहे. यासाठी कार्यकर्ता बंधूंनी अटल बुथ संमेलन, हर-हर मोदी, घर-घर मोदी यांसारख्या विविध निवडणूक प्रचार उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन कामास लागावे असे आवाहन नामदार श्री संभाजीराव पाटील निंलगेकर साहेबांनी केले.

या मेळाव्यास आ.श्री.सुधाकराजी भालेराव, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.नागनाथजी निडवदे, प्रदेश उपाध्यक्ष श्री.गोविंदजी केंद्रे, जि.प.उपाध्यक्ष श्री.रामचंद्रजी तिरुके, माजी आ.श्री.मनोहरजी पटवारी, श्री.भगवानजी पाटील तळेगावकर, उदगीरचे नगराध्यक्ष श्री.बास्वराजजी बागबंदे, श्री.शिवाजी केंद्रेजी, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ.उत्तराताई कलबुर्गे, भाजपा पदाधिकारी, बुथ प्रमुख व कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.