Friday, March 29, 2024
Homeमराठवाडालातूरएकाच दिवशी ग्रामसभा घेवून पिंकाच्या नुकसानीचे पंचनामे करावेत- संभाजीराव निंलगेकर

एकाच दिवशी ग्रामसभा घेवून पिंकाच्या नुकसानीचे पंचनामे करावेत- संभाजीराव निंलगेकर

लातूर : अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी सर्व गावांत एकाच दिवशी ग्रामसभा घेऊन एकही शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी लातूर जिल्हा प्रशासनास दिले आहेत.अशा ग्रामसभा घेऊन पंचनामे करणारा लातूर हा एकमेव जिल्हा ठरेल.

लातूर जिल्हयात अतिवृष्टीने काढणीस आलेल्या सोयाबीनसह अन्य शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची नुकतीच पाहणी करून पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांनी विमा कंपनी अनावश्यक कागदपत्रांची मागणी करून अडवणूक करण्याची भूमिका घेत असल्याने पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची जाहीर कानउघाडणी केली.

पंचनाम्यांच्या संदर्भात येत असलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत पालकमंत्र्यांनी आज, दि. ७ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना फॅक्सद्वारे आदेश दिले की, लातूर जिल्ह्यातील  शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या हेतूने एकाच दिवशी ग्राम सभा घेण्यात याव्यात व सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या तक्रारीची घ्यावी. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीने शेतकरी कोलमडून पडले आहेत.

त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची कागदपत्रे मागून पिळवणूक न करता सरसकट पंचनामे करावेत. लातूर जिल्ह्यातील एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही, याची जिल्हा प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे आदेश पालकमंत्री संभाजीराव पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments