Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमराठवाडालातूरलातूर शहर मनपाच्यावतीने कलाक्षेत्र व विविध सामाजिक क्षेत्रात नैपुण्यपूर्ण कामगिरी करणा-या मान्यवर...

लातूर शहर मनपाच्यावतीने कलाक्षेत्र व विविध सामाजिक क्षेत्रात नैपुण्यपूर्ण कामगिरी करणा-या मान्यवर व्यक्तींना विविध पुरस्कारांनी संभाजीराव पाटील निंलगेकरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले

Sambhajirao Patil Nilangkar,Sambhajirao,patil,nilangekar,laturलातुर : लातुर महानगर पालिकेच्या वतीने देण्यात येणारा पुरस्कार आज यावेळी नाट्यवर्य कै.श्रीराम गोजमगुंडे कलारत्न पुरस्कार मराठी नाटय व चित्रपट तथा दक्षिण भारतीय सिनेमातील स्टार सयाजी शिंदे भारतीय सिनेमातील गुरुजी पुरस्कार पांडुरंग मुखडे यांना संभाजीराव पाटील निंलगेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी बोलताना पालकमंञी निंलगेकर म्हणाले की “लातूरकर नागरिक कला, साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असून कलेची ही आवड जोपसावी म्हणून लवकरच नाट्यगृहाच्या इमारतीचे काम सुरु होऊन वर्षभरात नाट्यगृह तयार होईल” अशी ग्वाही या प्रसंगी मंञी निंलगेकर यांनी केली. पुरस्कार प्राप्त सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. लातूरला लाभलेल्या वैभवांना आज पुरस्कार देण्यास अतिशय आनंद होत आहे, असे प्रतिपादन यावेळी केले.

पुरस्कार सोहळ्यास अरविंद जगताप(चित्रपट लेखक), शैलेश लाहोटी(भाजप शहर जिल्हाध्यक्ष), जी श्रीकांत(जिल्हाधिकारी), सुरेश पवार(महापौर), देविदासजी काळे(उपमहापौर), ॲड.शैलेश गोजमगुंडे(सभागृहनेते),  बिराजदार(परिवहन समिती सभापती) यांच्या सह इतर पुरस्कार प्राप्त मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments