Placeholder canvas
Wednesday, April 17, 2024
Homeमराठवाडालातूरअडीच कोटी रुपयाची इमारत धूळ खात पडून, उपचाराअभावी जखमी रुग्णांचे हाल

अडीच कोटी रुपयाची इमारत धूळ खात पडून, उपचाराअभावी जखमी रुग्णांचे हाल

शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली ट्रामा केअर सेंटर केवळ आधुनिक यंत्रणा नसल्याने गेल्या तीन वर्षापासून अडीच कोटी रुपयांची इमारत धूळ खात पडून आहे. परिणामी राष्ट्रीय महामार्गावरील अपघातग्रस्त रुग्णांना, जखमींना वेळेवर उपचार मिळत नसल्याने हाल होत आहेत. अहमदपूर हे तालुक्याचे ठिकाण असून 123 गाव खेड्यांनी, वाड्यातांड्यांनी जोडला गेलेला तालुका आहे. याच शहरातून राष्ट्रीय महामार्ग जातो.

तालुक्यासह शहराची लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यातील आरोग्याचा प्रश्नही गंभीर आहे. येथे शासकीय अद्यावत रुग्णालय नाही त्यामुळे गोरगरीब, सर्वसामान्यांना विविध उपचारासाठी खाजगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो. विशेषतः अपघातातील व्यक्तीवर तातडीने शस्त्रक्रिया करण्यासाठी लातूर, नांदेड, अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागते. गत तीन वर्षापासून शासनाने ट्रामा केअर सेंटरसाठी अडीच कोटींच्या इमारत अहमदपूर ग्रामीण रुग्णालयालगत उभारली आहे मात्र या ट्रामा केअर सेंटरचे संपूर्ण काम गेल्या तीन वर्षात पूर्ण झाले आहे असून केवळ यंत्रणात मशनरी नसल्याने अद्यापही हे सेंटर सुरू झाले नाही.

अहमदपूर ग्रामीण रुग्णालयात सिटीस्कॅन, सोनोग्राफी, डायलिसीस त्याचबरोबर रात्री बेरात्री रुग्णाच्या उपचारासाठी लागणारे रक्त उपलब्ध करण्यासाठी ब्लड बँक ही नाही. ग्रामीण रुग्णालयात दररोज 500च्या वर बाह्यरुग्ण तपासणीसाठी ग्रामीण भागासह शहरात येतात मात्र गंभीर आजाराची तपासणी करण्यासाठी त्याचबरोबर आगीत, अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांवर तातडीने उपचार शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणाऱ्या आधुनिक सुविधांचा अभाव आहे. अनेकांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अपघातातील अनेक जखमीनां वेळेवर उपचार मिळत नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागत आहे. शासनाने कोट्यावधी रुपयातून उभारलेल्या ट्रामा केअर सेंटरची इमारत धूळ खात पडून आहे. ते सेंटर तातडीने सुरू होण्याची गरज असल्याचे मत जाणकारांतून व्यक्त होत आहे.

बांधकाम विभागातर्फे काम अपूर्ण असून बांधकाम विभागाला पत्र व्यवहार दोन–चार वेळेस करूनही सहकार्य मिळत नाही. त्यामुळे काम अपूर्ण आहे तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे टेबल, खूर्ची, ऑपरेशन थेटर मधील साहित्याची मागणी केली आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सिंहाते यांनी मंबई माणुस च्या प्रतिनिधीला दिली आणि तालुक्यांची लोकसंख्या साडेतीन ते चार लाखाच्या घरात जाते. अहमदपूर तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य आणि 25 उपकेंद्र असून शहरात 30 खाटांचे शासकीय ग्रामीण रुग्णालय आहे. मात्र ग्रामीण रुग्णालयात अपघातातील जखमींवर शस्त्रक्रिया करण्याच्या सुविधा उपलब्ध नाहीत परिणामी खेड्यापाड्यातील रुग्णांची, अपघातातील जखमींची हेळसांड होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments