Thursday, March 28, 2024
Homeमराठवाडानांदेडचार नराधम शिक्षकांचा सहावीत शिकणा-या विद्यार्थिनीवर बलात्कार

चार नराधम शिक्षकांचा सहावीत शिकणा-या विद्यार्थिनीवर बलात्कार

gang rape

नांदेड : नांदेडमध्ये चार नराधम शिक्षकांनी सहावीत शिकणा-या विद्यार्थीनीला अश्लिल व्हिडिओ दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पीडित अल्पवयीन विद्यार्थीनी मृत्यूशी झुंज देत आहे. आरोपी शिक्षक फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

बिलोली तालुक्यातील ४ शिक्षकांनी गुरू-शिष्य परंपरेला काळीमा फासत इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला आहे. पीडितेची प्रकृती गंभीर असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात या चार नराधमांविरुद्ध पॉक्सो कायदा, तसेच कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित विद्यार्थीनीला अश्लिल व्हिडिओ दाखवला….

पीडित विद्यार्थिनी साईबाबा विद्यालयात शिकते. हे विद्यालय नांदेड जिल्ह्याच्या मुख्यालयापासून ५० किमीच्या अंतरावर आहे. या चार शिक्षकांनी सामूहिक बलात्कार करत असताना पीडित विद्यार्थीनीला अश्लिल व्हिडिओ देखील दाखवला. घडलेल्या सारा प्रकार या पीडितेने आपल्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर विद्यालय परिसरात खळबळ उडाली. या अत्याचारानंतर पीडितेला उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

गुन्हे दाखल होताच शिक्षक फरार….

दयानंद राजुरे, प्रदीप पाटील, सय्यद रसुल,  धनंजय शेळके अशी या अत्याचार करणाऱ्या शिक्षकांची नावे आहेत. त्यांना साथ देणारी महिला कर्मचारी सुरेखा बनसोडे हिच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर हे चारही शिक्षक आणि महिला कर्मचारी फरार झाले आहेत. पोलीस यांचा शोध घेत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments