Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमराठवाडाउस्मानाबादअपघात : कंटेनरने दोन पोलिसांना चिरडले

अपघात : कंटेनरने दोन पोलिसांना चिरडले

The container crushed two policemen
उस्मानाबाद : सोलापूर-औरंगाबाद महामार्गावर येडशी येथे भीषण अपघात घडला. या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्यासह एका होमगार्डचाही जागीच मृत्यू झाला आहे. मध्यरात्री 3 वाजता ही दुर्घटना घडली.

तुळजापूरला जाणाऱ्या मोठ्या चारचाकी वाहनांना वळवण्यासाठी नाकाबंदी लावण्यात आली होती. यामध्ये पोलीस कर्मचारी दीपक नाईकवाडी व होमगार्ड संतोष जोशी हे दोघेही अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचा-यांची नावे आहेत.

नवरात्रोत्सव संपल्यामुळे भाविक पुन्हा आपापल्या घरी जाण्यासाठी निघाले आहेत. त्यामुळे तुळजापूरच्या दिशेने येणारी-जाणारी वाहतूक वळवण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी केली होती. त्यासाठी त्यांनी चेकपोस्ट उभे केले होते. मात्र, मध्यरात्री 3 च्या सुमारास अर्ध्या झोपेत असलेल्या पोलिसांच्या अंगावरुन कंटेनर गेला. त्यामध्ये दोन सुरक्षा रक्षकांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी सिग्नल, लाईट सुरू न ठेवल्यानं कंटेनर चालकाला नाकाबंदी असल्याचं समजून आलं नाही. त्यामुळे, भरधाव कंटेनर थेट नाकाबंदीच्या चेकपोस्टमध्ये घुसल्याने ही दुर्दैवी घटना घडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments