Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमराठवाडाउस्मानाबादखासदार ओमराजे निंबाळकरांनी चाकू हाताने अडवल्यामुळेच त्यांचे जीव वाचले

खासदार ओमराजे निंबाळकरांनी चाकू हाताने अडवल्यामुळेच त्यांचे जीव वाचले

MP Omraje Nimbalkarउस्मानाबाद : शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर एका तरुणाने चाकूने खुनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये ओमराजे निंबाळकर यांनी चाकू हाताने अडवल्यामुळे तो त्यांच्या पोटात शिरला नाही. हाताला दुखापत झाली. ओमराजेंचे प्राण वाचले. ही खळबळजनक घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब इथं घडली.

प्रचारसभेदरम्यान गर्दीचा फायदा घेत ओमराजे यांच्यावर  हल्ला झाला. हात मिळवण्याच्या बहाण्याने हल्लेखोर ओमराजेंजवळ गेला. त्यावेळी त्याने चाकू काढला आणि ओमराजेंवर हल्ला केला. माथेफिरुने खासदार ओमराजेंवर तब्बल तीन वार केले. पवनराजेंच्या हातातील घड्याळावर चाकूचे वार बसले. घड्याळाच्या बाजूला हातावरही वार बसले. वार चुकल्यानंतर माथेफिरु पळून गेला. या चाकू हल्ल्यात ओमराजे यांच्या हाताला दुखापत झाली.

ओमराजे निंबाळकर यांच्यावर दिवसा ढवळ्या चाकूहल्ला झाला. ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांचे काही वर्षापूर्वी हत्या झाली होती. ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले नेते पद्मसिंह पाटील घराण्याचे टोकाचे वैर आहेत.
ओमराजे निंबाळकर 2019 मध्ये उस्मानाबाद मतदारसंघातून लोकसभा खासदार झाले. त्यांनी पद्मसिंह पाटलांचे सुपुत्र राणा जगजीत सिंह पाटील यांचा पराभव केला होता. ओमराजे हे 2009 मध्ये उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. त्यानंतर त्यांना शिवसेनेने 2019 मध्ये लोकसभेचं तिकीट दिलं आणि ते निवडून आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments