Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमराठवाडापरभणीअहो आश्र्चर्यम! भाजपच्या मंडळींचा सीएए-एनआरसी विरोधात ठराव मंजूर

अहो आश्र्चर्यम! भाजपच्या मंडळींचा सीएए-एनआरसी विरोधात ठराव मंजूर

CAA NRC Protestsसेलू ( परभणी ) : देशभरात सध्या सीएए, एनआरसी व एनपीआर या मुद्यांवरून गोंधळ उडालेला आहे. काही मंडळी समर्थनार्थ तर काही विरोधात आंदोलन करत आहेत. मात्र, दुसरीकडे भाजपाची सत्ता असलेल्या परभणी जिल्ह्यातील सेलू नगरपरिषदेत सर्वसंमतीने सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि प्रस्तावित राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) च्या मलबजावणीविरोधात एकमताने ठराव मंजूर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नगरपरिषदेचे अध्यक्ष विनोद बोराडे माध्यमांशी बोलताना सांगितले की, सर्व सदस्यांनी सीएए आणि एनआरसी विरोधात प्रस्ताव दिला होता. त्याला कुणाचाही विरोध नसल्यामुळे २८ फेब्रुवारी रोजी पारीत झाला. नगरपरिषदेत २७ नगरसेवक आहेत व तीन सहस्वीकृत सदस्य आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी या निर्णयाच्या बाजूने होते. प्रस्ताव पारीत होण्याच्या दोन दिवस अगोदर एक बैठक बोलवण्यात आली होती. ज्याची मागणी काँग्रेस, राष्ट्रवादीचे सदस्य व मुस्लीम समुदायाच्या सात नगरसेवकांकडून करण्यात आली होती. असे देखील बोराडे यांनी सांगितले आहे. नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या निर्णयामुळे आता भाजपा अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र भाजप काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सेलूतही शाहीनबाग….

सेलू येथे भारतरत्न डॉ.बाबासाहबे आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात २१ जानेवारीपासून रात्री ७ ते १० या कालावधीत शाहीनबागच्या धर्तीवर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामागील जनभावना लक्षात घेऊन सेलू नगरपरिषदचे नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी यावर चर्चा करण्यासाठी २८ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. या सभेत सीएए, एनआरसी व एनपीआर याबद्दल चर्चा झाली व महाराष्ट्र शासनाने याबाबी राज्यात लागू करू नये अशी शिफारस करण्याचा ठराव मंजूर झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments