Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
HomeमराठवाडापरभणीMaharashtra Vidhan Sabha : जेलमधून गुट्टे निवडणूक लढवून जिंकले!

Maharashtra Vidhan Sabha : जेलमधून गुट्टे निवडणूक लढवून जिंकले!

Ratnakar Gutteगंगाखेड : एखादा नेता तुरुंगात राहून निवडणूक लढतो जिंकतो हे आपण चित्रपटात बघितले. मात्र, मराठवाड्यात तसे प्रत्यक्षात घडले. राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार रत्नाकर गुट्टे चार महिन्यांपासून तुरुंगात असूनही परभणीच्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे.
शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घेऊन फसवणूक केल्या प्रकरणात गंगाखेड शुगरचे चेअरमन तथा उद्योजक रत्नाकर गुट्टे हे जवळपास चार महिन्यांपासून परभणीच्या जेलमध्ये आहेत. रत्ताकर गुट्टे यांनी शिवसेनेच्या विशाल कदमांचा 18 हजार 896 मतांनी पराभव केला आहे. या मतदारसंघात शिवसेनेतर्फे विशाल कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुसुदन केंद्रे आणि दोन अपक्ष संतोष मुरकुटे आणि सीतीराम घनदाट अशी बहुरंगी लढत होती.
रत्नाकर गुट्टे हे रासपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. गुट्टेंच्या प्रचाराची धुरा त्यांच्या नातेवाईकांनी सांभाळली. त्यांच्या प्रचाराची धुरा त्यांचे जावई राजाभाऊ फड व जनसंपर्क अधिकारी हनमंत लटपटे यांनी सांभाळली होती.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments