काँग्रेसचे वरपूडकर जिंकले, भाजपचे फड आमदार हरले!

- Advertisement -

Suresh Warpudkar mohan phad
परभणी : परभणी जिल्ह्याती पाथरी मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार मोहन फड यांचा काँग्रेसचे सुरेश वरपूडकर यांनी पराभव केला. वरपूडकरांच्या कार्यकर्त्यांना जल्लोष साजरा केला. येथे तगडी फाईट झाली होती. यामुळे भाजपला मोठा धक्का बसला.

परभणी जिल्ह्यात पाथरी, जिंतूर, गंगाखेड आणि परभणी असे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. या विधानसभा मतदारसंघांपैकी जिंतूर आणि गंगाखेड या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. परभणी मतदारसंघात मागील 30 वर्षांपासून शिवसेनेचे आमदार राहिलेले आहेत. मागील निवडणुकीत मोहन फड हे पाथरी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले होते. त्यानंतर आमदार मोहन फड यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत खासदार संजय जाधव यांच्यात वाद झाल्यामुळे त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

- Advertisement -