Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमराठवाडाऔरंगाबादकॉपी करु दिली नाही म्हणून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

कॉपी करु दिली नाही म्हणून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

औरंगाबाद : आठवडाभरा पूर्वीच एका एमआयटी महाविद्यालयातील एका विद्यार्थीची कॉपी पकडल्यानंतर त्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतांना विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयात  परीक्षा केंद्रात कॉपी घेऊन जाण्यास मज्जाव केल्याने विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या अकाऊंटटला मारहाण करत इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार घडला.

विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयात आज एमपीएड परीक्षेचा पहिला पेपर होणार होता. या पेपराला जाताना परीक्षार्थी सतीश राजीव वाघमारे याने कॉपी घेऊन जाण्यास मज्जाव केल्याने अकाऊंटंटच्या कानाखाली लगावली. त्यानंतर दुसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याची धमकी देत गोंधळ घातला. त्यामुळे महाविद्यालय प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. सतीश वाघमारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शारीरिक शिक्षणशास्त्र विभागातील एमपीएडचा विद्यार्थी आहे. या प्रकरणी विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments