Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रशिवसेना खासदारांसोबत मातोश्रीवर आज खलबतं

शिवसेना खासदारांसोबत मातोश्रीवर आज खलबतं

Meeting of Uddhav Thackeray and Shiv Sena MPs at Matoshree
Image : PTI

मुंबई : शिवसेनेनं महाराष्ट्रात सत्तापालट केल्यानंतर शिवसेनेने एनडीएशी घरोबा तोडला. त्यानंतर आज प्रथमच शिवसेना खासदारांची मातोश्री निवासस्थानावर दुपारी 12 वाजता बैठक होत आहेत. या बैठकीत शिवसेना पक्ष प्रमुख, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे खासदारांना मार्गदर्शन करणार आहेत.

एनडीएमध्ये शिवसेनेच्या वाट्यावर एकच खासदापद होते. मात्र शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर अरविंद सावंत यांनी खासदारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढण्यात आल्याची घोषणा भाजपकडून करण्यात आली होती. शिवसेना खासदारांची आसनव्यवस्था बदलण्यात आली आहे. त्यानंतर शिवसेना खासदार चांगलेच आक्रमक झाले आहेत.

शिवसेना खासदारांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीची भेट घेतली होती. आज खासदार आता विरोधक असल्यामुळे ते संसदेत आक्रमकपणे आपली भूमिका मांडतांना दिसत आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज आपल्या खासदारांना का मंत्र देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे 18 खासदार असून राज्यातील शेतक-यांचे प्रश्न व इतर मुद्द्यांव चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments