
दहिसर पूर्व ते अंधेरी पश्चिम या बहुप्रतिक्षित मेट्रो २ अ चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ३६ महिन्यांची मुदत वाढवून दिली असून कामचुकार कंत्राटदारांवर फक्त ३६ लाखांचा दंड आकारल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिल्ली मेट्रो रेल्वे कॉपोरेशनने दिली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीएकडे मेट्रो कामाची सद्यस्थिती आणि कंत्राटदारांवर आकारलेल्या दंडात्मक कारवाईची माहिती मागितली होती. दिल्ली मेट्रो रेल्वे कॉपोरेशनने अनिल गलगली यांस कळविले की दहिसर पूर्व ते अंधेरी पश्चिम या मेट्रो २ अ ही सेवा ३१ डिसेंबर २०१९ रोजी सुरु करण्याचे निश्चित करण्यात आले होते. प्रथम चरण दहिसर पूर्व पासून डहाणूकर वाडी ही सेवा २ एप्रिल २०२२ रोजी सुरु करण्यात आली आहे. दुसरे चरण जानेवारी २०२३ रोजी पूर्ण करण्यात आले. यास ३६ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. सिव्हिल कामात सुरक्षा उल्लंघन आणि साईटवर सुरक्षा सुधार बाबतीत सुरक्षा दंड आकारला आहे. पण त्याची माहिती दिली नाही. इलेक्ट्रिकल कामात करण्यात आलेल्या दिरंगाईबाबत ३६ लाखांचा दंड आकारला आहे. यात माविन स्विचगर्स अँड कंट्रोल या कंत्राटदारांस ४.४४ लाख रुपये, स्टर्लिंग अँड विल्सन व सिमेचेल इलेक्ट्रिक या कंत्राटदारांस १.५० लाख रुपये, जॅक्सन या कंत्राटदारांस १.५३ लाख रुपये, केटीके ग्रुप चीन या कंत्राटदारांस २८.५४ लाख रुपये इतका दंड आकारला आहे.
अनिल गलगली यांच्या मते, “काम पूर्ण होण्यात झालेली दिरंगाई लक्षात घेता दंड आकारण्यात एमएमआरडीएने कंजुषी दाखविली आहे. यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होत नाही.”
Web Title: Metro 2 A antargat kaamchukar kantratdaranvar fakt 36 lakhancha dand