किल्लारी परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

- Advertisement -

मुंबई : लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातल्या किल्लारीसह आसपासच्या आठ ते दहा गावात आज दुपारी १२ वाजून २३ मिनिटाला भूकंपाचा सौम्य धक्का बसला. किल्लारी परिसरात अधून मधून भूकंपाचे धक्के नेहमीच बसतात. मात्र आजचा हा भूकंपाचा धक्का इतर धक्क्यांपेक्षा मोठा असल्यानं किल्लारी परिसरातील नागरिकांत भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

अचानक भूकंप झाल्यानं गावातील सर्व लोक घराबाहेर पडले आहेत. १९९३ साली महाप्रलयकारी भुकंपानं किल्लारी सह आसपासची दहा गावं उध्द्वस्त झाली होती. त्यामुळे आजही या भागात भूकंपाची दहशत नागरिकांमध्ये आहे. आजचा भूकंप हा ३.० रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा असल्याची नोंद भूकंप मापन केंद्रात करण्यात आली.

- Advertisement -
- Advertisement -