Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्‍ट्रमिलिंद एकबोटेला पुन्हा पोलीस कोठडी!

मिलिंद एकबोटेला पुन्हा पोलीस कोठडी!

पुणे – कोरेगाव भीमा प्रकरणात अटकेत असलेले मिलिंद एकबोटेला अॅट्रॉसिटी आणि षडयंत्र रचण्याच्या गुन्ह्यात जामीन मंजूर झाला आहे. मात्र शिक्रापूर पोलिसात जाळपोळ आणि हिंसाचार प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात एकबोटेला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

कोरेगाव भीमा येथे तरुणांची माथी भडकवून समाजात तेढ निर्माण करुन दंगल घडवली गेली. त्या दंगलीत अनेकांचे नुकसान झाले तर एका तरुणाचा मृत्यू देखील झाला होता. ही दंगल घडविण्यामागे मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांचा हात असल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments