Friday, March 29, 2024
Homeदेशमिलिंद एकबोटेंना अद्याप अटक का नाही?; सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला प्रश्न

मिलिंद एकबोटेंना अद्याप अटक का नाही?; सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला प्रश्न

महत्वाचे..
१. एकबोटेंच्या जामीन अर्जावर १४ मार्चला सुनावणी
२. हिंसाचारासाठी एकबोटे,भिडे यांनी चिथावणी दिल्याचा आरोप
३. एकबोटेंच्या विरोधात पिंपरी आणि औरंगाबादेत गुन्हे दाखल


नवी दिल्ली: १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा या ठिकाणी जो हिंसाचार उसळला. या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला. या हिंसाचारासाठी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे या दोघांनी चिथावणी दिल्याचा आरोप आहे. मिलिंद एकबोटेंना अद्याप अटक का करण्यात आली नाही? असा प्रश्न आज सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला. एकबोटेंच्या विरोधात पिंपरी आणि औरंगाबाद या दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मिलिंद एकबोटेंच्या अंतरिम जामिनावर १४ मार्चला सुनावणी होईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मिलिंद एकबोटे यांच्याकडून मुकुल रोहतकी हे वकील आहेत तर सरकारी वकील निशांत कंटेश्वर आहेत अशीही माहिती मिळते आहे.

१ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा येथील शौर्यस्तंभाला वंदन करण्यासाठी आलेल्या जमावावर हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला. दीड ते दोन हजारांच्या जमावाने अचानक हल्ला केला. या जमावाला संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे या दोघांनी चिथावणी दिल्याचा आरोप आहे. ज्या दिवशी ही घटना घडली त्यादिवशी आपण त्या ठिकाणी नव्हतो असा दावा एकबोटे यांनी केला आहे. एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने २२ जानेवारीला फेटाळला. त्यामुळे मिलिंद एकबोटेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली. हायकोर्टानेही एकबोटेंना दिलासा दिला नाही त्यानंतर एकबोटेंनी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. सुप्रीम कोर्टाने एकबोटेंच्या जामीन अर्जावरची सुनावणी पुढे ढकलली आहे. १४ मार्चला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असल्याचे समजते आहे.

कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी आरोपी असलेले समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना ७ फेब्रुवारी रोजी सुप्रीम कोर्टाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. याप्रकणी २० तारखेपर्यंत त्यांना दिलासा मिळाला होता. आज आता या प्रकरणाची सुनावणी १४ मार्चला होणार असल्याचे समजते आहे. एकबोटेंविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. दरम्यान, त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आता सुप्रीम कोर्टानेच या प्रकरणी मिलिंद एकबोटेंना अटक का करण्यात आली नाही असा प्रश्न राज्य सरकारला केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments