Thursday, March 28, 2024
Homeदेशपुन्हा एकदा दुधाच्या दरात होणार वाढ ?

पुन्हा एकदा दुधाच्या दरात होणार वाढ ?

MILK PRICE HIKE 4-5-Rs per litre-says-amulमुंबई : दुधाच्या दरात प्रति लिटर ४ ते ५ रुपयांची, तर दुग्धजन्य पदार्थ्यांच्या दरात ८ ते १० रुपयांची वाढ अपेक्षित असल्याचं अमूलचे व्यवस्थापकीय संचालक आर. एस. सोढी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वीच जवळपास सर्वच दूध विक्रेत्या कंपन्यांनी दुधाच्या दरात वाढ केली होती. यानंतर आता पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

दूध पुरवठा करण्याची क्षमता जास्त असलेल्या कंपन्यांना यंदा मोठा फायदा होईल, असा अंदाज सोढी यांनी वर्तवला आहे. ‘गेल्या तीन वर्षांमध्ये दूध उत्पादक कंपन्यांनी दोनदा दुधाच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचं उत्पन्न २०१८ च्या तुलनेत २० ते २५ टक्क्यांनी वाढलं आहे.’ असं सोढी म्हणाले.

सध्या देशात ५३.५ मेट्रिक टन दुधावर प्रक्रिया होते. २०२५ पर्यंत हाच आकडा १०८ मेट्रिक टनवर नेण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. यासाठी ४० ते ५० हजार कोटींची गुंतवणूक आवश्यक आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात दूध उद्योगासाठी बऱ्याच चांगल्या तरतुदी केल्याचं हि सोढी यांनी सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments