Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमराठवाडाऔरंगाबादपरीक्षेला बसू न दिल्याने विद्यार्थ्याने पाचव्या मजल्यावरून मारली उडी!

परीक्षेला बसू न दिल्याने विद्यार्थ्याने पाचव्या मजल्यावरून मारली उडी!

Aurangabad

औरंगाबाद- एमआयटी नर्सिंगच्या विद्यार्थ्याने पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज १० एप्रिल मंगळवार पासून परीक्षेला सुरूवात झाली. विद्यार्थ्याला परीक्षेला बसू न दिल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा एमआयटीमध्ये सुरु आहे.

सचिन वाघ असे आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या विद्यार्थ्याचे नाव आहे. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये तातडीने हलवण्यात आले आहे.

सचिन वाघ हा नर्सिंगचा विद्यार्थी आहे. आजपासून त्याची परीक्षा सुरु झाली आहे. आर्थिक परिस्थितीमुळे तो पूर्ण फी भरू शकला नाही. त्यामुळे त्याला परीक्षेला बसू न दिल्याने त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलेले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments