भाजपाने रामाच्या नावावर पैसे वसुलीचा ठेका घेतला आहे का? ; नाना पटोलेंचा हल्लाबोल

- Advertisement -
Mla-Nana-Patole-congress-president-Narendra-Modi- Ram Mandir-bjp
Mla-Nana-Patole-congress-president-Narendra-Modi- Ram Mandir-bjp

मुंबई: अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी देणगी गोळा केली जात आहे. काही ठिकाणी देणगीसाठी जबरदस्ती केली जात असल्याच्या तक्रारीही येत आहेत. रामाच्या नावावर पैसे गोळा करणारे हे कोण आहेत ? रामाच्या नावावर वसुलीचा ठेका भारतीय जनता पक्षाने घेतला आहे का? असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

नाना पटोले यांनी आज विधानसभेत राम मंदिराच्या देणगीचा प्रश्न उपस्थित करत भारतीय जनता पक्षावर प्रश्नांची सरबत्ती केली. ते म्हणाले की, राम मंदिरासाठी पैसे मागितले आणि देण्यास नकार दिल्यानंतर धमकी देण्यात आली अशी तक्रार आपल्याकडेही आली आहे.

हेही वाचा: उद्धव ठाकरे विसरलेत ते मुख्यमंत्री आहेत;आझमी कडाडले

भगवान श्रीरामाच्या नावावर महाराष्ट्रात पैसे मागितले जात आहेत. त्यांना असे पैसे गोळा करण्याचा काय अधिकार आहे? राम मंदिरासाठी गोळा केला जाणारा पैसा कोणत्या चॅरिटी ट्रस्टकडून घेतला जात आहे तसेच राम मंदिरासाठी 30 वर्षांपूर्वी जमा केलेला पैसा कुठे गेला? त्याचा हिशेब भाजपने द्यावा, असेही पटोले म्हणाले.

- Advertisement -
हेही वाचा: शिवसेनेला डिवचण्यासाठी संजय निरुपमांना काँग्रेसने तर सोडले नाही ना?
- Advertisement -