Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रमनसे : अखेर अमित ठाकरेंची नेतेपदी निवड!

मनसे : अखेर अमित ठाकरेंची नेतेपदी निवड!

Amit Thackeray Launched in MNS, amit thackeray, raj thackeray, maha adhiveshan, mns, mns adhikrut, thackeray, maharashtra, amit thackeray launchedमुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांची पक्षाच्या नेतेपदी निवड झाली. सर्व मनसैनिकांच्या संमतीनं अमित ठाकरे यांच्या नावाचा ठराव पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी मांडला. त्यानंतर त्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. मनसेच्या महाअधिवेशनात अखेर आज मोठी घोषणा झाली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

अमित ठाकरेंचा लाँचिग होणार याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर मनसेच्या महाअधिवेशनात अखेर अमित ठाकरे यांचं लाँचिंग झालं. अमित यांची मनसेच्या नेतेपदी निवड केल्याची घोषणा पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठावर अमित यांचे शाल आणि तलवार देऊन स्वागत केलं. अमित ठाकरे यांना संपूर्ण ठाकरे कुटुंबाकडून शुभेच्छा देण्यात आल्या. पक्षाच्या नेतेपदी अमित यांच्या नावाची घोषणा होताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

माझ्या पायाखालची वाळू सरकली – अमित ठाकरे

अमित व्यासपीठावर येताच महाअधिवेशनात उपस्थित मनसैनिकांनी प्रचंड जल्लोष केला. ‘काल संध्याकाळपर्यंत मला याबद्दल काहीच कल्पना नव्हती. संध्याकाळी उशिरा मला राज साहेबांनी सांगितलं. शिक्षणाचा ठराव मांडायचे असल्याचे समजले तेव्हा माझ्या पायाखालची वाळू सरकली,’ असं अमित ठाकरे म्हणाले. यावेळी अमित यांनी शिक्षणाचा ठराव मांडला.

शर्मिला ठाकरे यांनी मुलाची छबी कॅमे-यात टिपली…

शर्मिला ठाकरे यांनी आपल्या मुलाची म्हणजेच अमित यांची मोबाइल कॅमेऱ्यात छबी टिपली. यावेळी त्यांच्यासह अमित यांची पत्नी मिताली आणि बहीण उर्वशी या देखील भावूक झाल्या होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments