मनसेच पत्र: बँकांचे व्यवहार मराठीत करा

- Advertisement -

महत्वाचे…
१.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १८ नोव्हेंबर रोजी ठाण्यात जाहीर सभेत मराठीच्या मुद्द्याला हात घातला
२.वांद्रे-कुर्ला संकुलातील अलाहाबाद बँक, पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँकांना मनसेकडून देण्यात आलं पत्र
३.मराठीत व्यहार झाला नाही तर मनसेचे पुन्हा खळ्ळखट्याक सुरु होण्याची शक्यता


मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलातील अलाहाबाद बँक, पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँकांना आज मनसेकडून पत्र देण्यात आलं. लवकरात लवकर बँकांचे व्यवहार मराठी भाषेत सुरु करावेत, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करु, अशा इशारा या पत्रातून देण्यात आला आहे.

- Advertisement -

१८ नोव्हेंबर रोजी ठाण्यात झालेल्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्याला हात घातला होता. बँकांचे व्यवहार मराठीत करा, नाहीतर आंदोल करु, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार, आज मनसेकडून बीकेसीमधील बँकांना पत्र देऊन व्यवहार मराठीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ठाण्याच्या सभेत राज ठाकरे म्हणाले होते की,रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नियम आहे की, बँकेचा व्यवहार हा संबंधित राज्याच्या प्रादेशिक भाषेनुसारच असावा. मात्र महाराष्ट्रात तसं होताना दिसत नाही. प्रत्येक राज्यात बँकेचा व्यवहार हा त्यांच्या प्रादेशिक भाषेमध्ये होते, असं राज ठाकरे म्हणाले होते. कार्यकर्ते आता मराठी भाषेत व्यवहार व्हावा. बँकेत भाषा बोलली जावे यासाठी बँकांशी पत्र व्यहार करत आहेत. मनसैनिक बँकेत जाऊन व्यवहार मराठीत सुरु आहे की नाही ते पाहतील. जर होत नसतील, तर ते करण्यास भाग पाडतील. आम्ही कोणताही कायदा मोडत नाही, फक्त आरबीआयचे नियम लागू करत आहोत, असं राज ठाकरे म्हणाले होते.

- Advertisement -