Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रमनसेचे संदीप देशपांडेंसह इतर हल्लेखोरांना अटक

मनसेचे संदीप देशपांडेंसह इतर हल्लेखोरांना अटक

मुंबई: काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. काँग्रेस कार्यालयावर हल्ला प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.

फेरीवाल्याच्या मुद्द्यावरुन मनसे आणि काँग्रेस वाद उफाळला असून आज मनसेकडून काँग्रेस कार्यालयावर झालेल्या हल्ला प्रकरणी संजय निरुपम यांच्या निवासस्थानी,काँग्रेस कार्यालयावर कडक पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. पोलिसांकडून  मनसे कार्यकर्त्यांची धरपडक सुरु आहे.

  • काँग्रेस कार्यालयावर हल्ला करणाऱ्यांना तातडीने अटक करा, गुरुदास कामत यांची मागणी
  • हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन, ६ जणांना ताब्यात घेतलं आहे, कडक कायदेशीर कारवाई करु : मुंबई पोलीस

Strongly condemn the cowardly attack on @INCMumbai HQ by @mnsadhikrut & deliberately inactive @Dev_Fadnavis Govt
State government is offering tacit support to these unlawful elements.

12:50 PM – Dec 1, 2017

काँग्रेसची मनसेविरोधात घोषणाबाजी

मनसेच्या या हल्ल्यानंतर काँग्रेसने मनसेविरोधात घोषणाबाजी केली. इतकंच नाही तर त्यांनी मनसेचे झेंडे जाळून निषेध व्यक्त केला.

जितेंद्र आव्हाड यांच्याकडून निषेध

या हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निषेध व्यक्त केला आहे. तसंच हल्लेखोरांना तातडीने अटक करुन, मुंबई पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी आव्हाड यांनी केली.

काँग्रेस कार्यालयावरील हल्ला भ्याड !: विखे पाटील

मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र निषेध करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

केवळ सवंग प्रसिद्धीसाठी हा हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे पुन्हा एकदा राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असं विखे म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments