Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeउत्तर महाराष्‍ट्रअहमदनगरजळगावात खिशातच मोबाइलचा स्फोट!

जळगावात खिशातच मोबाइलचा स्फोट!

MI mobileजळगाव: खिशात मोबाइलचा स्फोट झाल्याने एक जण जखमी झाला आहे. जळगावात ही घटना घडली आहे. मोबाइलचा स्फोट उन्हाचा पारा वाढल्यामुळेच झाला असा अंदाज वर्तवला जात आहे. खिशातच स्फोट झाल्याने विकार शफुल्ला खान जखमी झाले.

शनीपेठ भागातील काट्याफईल परिसरात राहणारे ४२ वर्षीय विकार शफुल्ला खान सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले असताना त्यांच्या खिशात असलेल्या मोबाइलचा स्फोट झाला. हा मोबाइल एमआय कंपनीचा होता. स्फोटामुळे त्यांची मांडी भाजली असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. स्फोटामागे वाढती उष्णता कारणीभूत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments