Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रखासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; गृहमंत्र्यांची घोषणा

खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; गृहमंत्र्यांची घोषणा

mohan-delkar-suicide-case-sit-will-investigation-anil-deshmukh-
mohan-delkar-suicide-case-sit-will-investigation-anil-deshmukh-

मुंबई:  मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांच्याबरोबरच खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा मुद्दा आज सभागृहात उपस्थित करण्यात आला. मोहन डेलकर यांनी मुंबईतील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. या मुद्द्याला उत्तर देताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी डेलकर आत्महत्या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत करण्यात येईल, अशी घोषणा केली.

विधानसभेत बोलताना गृहमंत्री देशमुख म्हणाले, “दादर नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर हे सात वेळा खासदार होते. सात वेळा खासदार राहिलेला व्यक्ती आत्महत्या करतो. तेही मुंबईत येऊन. त्यांनी सुसाईड नोटमध्ये सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. त्यात त्यांनी दादर नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल खेडा पटेल यांचं नाव घेतलेलं आहे.

खेडा पटेल आणि इतर अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात होता. वारंवार अडचणी निर्माण केलं जात होत. सामाजिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या पटेल यांच्या माध्यमातून दिल्या जात होत्या, असं डेलकर यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलेलं आहे,” अशी माहिती अनिल देशमुख यांनी सभागृहात दिली.

हेही वाचा: धक्कादायक! मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीवर केला शाळेतच बलात्कार

दादरा नगर हवेलीचे जे प्रशासक आहेत खेडा पटेल. ते पूर्वी भाजपा सरकारच्या काळात गुजरातचे गृहमंत्री होते. त्यावेळी कदाचित नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांची प्रशासक म्हणून त्यांची नेमणूक झालेली होती. डेलकर यांनी सुसाईड नोटमध्ये असं म्हटलं आहे की, मी मुंबईत येऊन आत्महत्या करतोय, त्रास मला तिकडे असला तरी इथे आत्महत्या करतोय.

कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्र सरकार यांच्यावर माझा विश्वास आहे. मला न्याय महाराष्ट्रातच मिळेल. त्यांच्या पत्नीने कलाबेन मोहन डेलकर यांनी सुद्धा मला पत्र दिलेलं आहे. अभिनव मोहन डेलकर यांनीही पत्र दिलेलं आहे. यापूर्वी सांगितलेले आरोपच केलेले आहेत,” असं देशमुख म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments