मोनोरेलच्या शेवटच्या दोन डब्यांना लागली मोठी आग!

- Advertisement -

मुंबई – मोनोरेलच्या शेवटच्या दोन डब्यांना मोठी आग लागली. म्हैसूर कॉलनी स्टेशनजवळील ही घटना आहे. या दुर्घटनेत मोनो रेलचे दोन्ही डबे जळून खाक झाले आहेत. सुदैवानं या घटनेते कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आगीमुळे मोनोरेलची वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. यामुळे ऐन कार्यालय गाठण्याच्या वेळी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

गुरुवारी (९ नोव्हेंबर) पहाटेच्या सुमारास स्टेशनवर मोनोरेल उभी असताना आग लागली. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी सुदैवानं गर्दी कमी होती. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. गुरुवारी पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी ही आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे.  आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाला तातडीनं याची माहिती देण्यात आली. यानंतर अग्निशमन दलानं आग विझवून परिस्थिती नियंत्रणात आणली.

- Advertisement -