होम महाराष्ट्र मान्सून केरळमध्ये दाखल; हवामान खात्याचा निकष

मान्सून केरळमध्ये दाखल; हवामान खात्याचा निकष

27
0
शेयर

दरवर्षी १ जूनला धडकणाऱ्या मान्सूनचे यंदा मात्र दोन ते तीन दिवस आधीच केरळात आगमन झाले आहे.
दक्षिण भागात तसेच अरबी समुद्राच्या अन्य भागात दाखल होण्यासाठी पोषक वातावरण तयार झालं असल्याचं हवामान खात्यानं वर्तवले होते.

केरळ आणि कर्नाटक किनाऱ्यालगत असलेल्या अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे हा पाऊस शेतीसाठी चांगला असेल. त्यामुळे पावसात सातत्य दिसून येईल, असे हवामान विभागाने म्हटलेय.

७ ते १० जून दरम्यान मान्सूनचा अंदाज याआधीच वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई तसेच आसपासच्या परिसरात ढगाळ वातावरणामुळे आजचे तापमान ३५ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

दरम्यान, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. तसेच मुंबईत मान्सून ६ जुनपर्यंत दाखल होईल असेच दिसत आहे.