Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात आज ८ हजार ८०७ कोरोनाचे रुग्ण सापडले, ८० रुग्णांचा मृत्यू

महाराष्ट्रात आज ८ हजार ८०७ कोरोनाचे रुग्ण सापडले, ८० रुग्णांचा मृत्यू

more-than-eight-thousand-new-covid-patients-in-maharashtra

more-than-eight-thousand-new-covid-patients-in-maharashtra

मुंबई: मुंबईसह महाराष्ट्रात दररोज करोनाबाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. आज राज्यात ८ हजार ८०७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. काल मंगळवारी ६ हजार २१८ नवे कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. त्यातुलनेत आजचे प्रमाण जास्त आहे. राज्यात आज करोनामुळे ८० रुग्णांचा मृत्यू झाला.

सध्या महाराष्ट्रातील मृत्यूदर २.४५ टक्के एवढा आहे. त्याचवेळी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७० टक्के एवढे आहे. राज्यात सध्या २ लाख ९५ हजार ५७८ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. २,४४६ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात अजून ५९ हजार ३५८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज २ हजार ७७२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत २० लाख ८ हजार ६२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

पुण्यात ७४३ करोनाबाधित 
आज पुणे शहरात दिवसभरात 743 करोना बाधित रुग्ण आढळले. तीन करोना रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
382 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मंगळवारी पुण्यात दिवसभरात ६६१ नवे करोनाबाधित आढळले, तर चार रुग्णांचा मृत्यू झाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments