Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रहोंडाने पुन्हा मागवली अॅक्टिवा, ग्रेजिया आणि एविएटर!

होंडाने पुन्हा मागवली अॅक्टिवा, ग्रेजिया आणि एविएटर!

मुंबई : होंडा मोटरसायकलची अॅक्टिवा या गाडीला तरुणांसोबतच इतरांनाही खूपच पसंती मिळाली. यासोबतच ग्राजिया आणि एविएटर या गाड्यांचीही मोठ्या प्रमाणात विक्री झाली. तुमच्याकडेही अॅक्टिवा, ग्राजिया किंवा एविएटर यापैकी एखादी गाडी तर नाही ना? तर चला काय आहे कारण आपण बघूया.

होंडाने पुन्हा मागवल्या गाड्या

होंडा मोटरसायकलने नुकतचं लॉन्च केलेली Activa१२५,ग्राजि‍या आणि एवि‍एटर या गाड्यांच्या काही युनिट्स पुन्हा मागवल्या आहेत. तांत्रिक अडचण आल्यामुळं कंपनीने या गाड्या पुन्हा मागवण्याचा निर्णय घेतला आहे.

…म्हणून घेतला हा निर्णय

या स्कूटर्समधील फ्रँट फॉर्कमध्ये लावण्यात आलेला बोल्ट खूपच कडक आहे आणि त्यामुळेच होंडाने आपल्या एकूण ५६,१९४ स्कूटर्स पुन्हा मागवल्या आहेत. देशभरातील होंडा सर्व्हिस सेंटर्सवर या गाड्यांची तपासणी करण्यात येणार आहे.

फ्री मध्ये करणार बदल

तसेच गरज पडल्यास बोल्ट बदलण्यात येणार आहे. बोल्टमध्ये फ्री मध्ये बदलून देण्यात येणार आहे आणि होंडा डीलरशिप लवकरच या संदर्भातील माहिती ग्राहकांना देणार आहे.

अॅक्टिवा जी आणि जी चा समावेश नाही… 

होंडाने आपल्या वेबसाईटवर म्हटलं की, कंपनीने पुन्हा मागवलेल्या अॅक्टिवा १२५, ग्राजिया आणि एविएटरची संख्या ५६,१९४ युनिट्सचा समावेश आहे. मात्र, अॅक्टिवा ४ जी आणि अॅक्टिवा ५ जी पुन्हा मागवण्यात येणार नाही कारण, या दोन्ही स्कूटर्समध्ये वेगळं सस्पेंशन सेटअप देण्यात आलं आहे.

७ फेब्रुवारी २०१८ ते ६ मार्च २०१८ या दरम्यान तयार करण्यात आलेल्या अॅक्टिवा १२५, ग्राजिया आणि एविएटर मधील खराब बोल्टला तपासलं जाणार आहे.

तुमची गाडी यात आहे का? असं तपासा…

होंडाने आपल्या वेबसाईटवर एक कॅम्पेन पेजवर या संदर्भात माहिती दिली आहे. या पेजच्या खालील बाजुला व्हिआयकल आयडेंटिफिकेशन नंबर (VIN) बॉक्स आहे त्याठिकाणी आपल्या स्कूटरवर VIN नंबर टाकून माहिती मिळू शकते. या व्यतिरिक्त ग्राहकांना टेक्सट मेसेज, ई-मेल किंवा फोनद्वारेही कळवण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments