Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeविदर्भगोंदियानाना पटोलेंच्या मतदारसंघातील पोटनिवडणुकीला हिरवा कंदील

नाना पटोलेंच्या मतदारसंघातील पोटनिवडणुकीला हिरवा कंदील

Nana Patole, Bombay High courtमहत्वाचे…

  • एप्रिल २०१४ भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघात निवडणूकीत भाजपाकडून नाना पटोले हे विजयी झाले होते
  • ८ डिसेंबर २०१७ ला पटोलेंचा खासदारकीचा राजीनामा
  • पोटनिवडणूक घेऊ नये म्हणून याचिका दाखल करण्यात आली होती

भंडारा: गोंदिया लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यास मुंबई उच्चन्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अखेर हिरवा कंदील दाखवला आहे. या मतदार संघात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपले उमेदवार दिल्यास पोटनिवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

एप्रिल २०१४ मध्ये भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघात निवडणूक झाली होती. यात भाजपाचे नाना पटोले हे विजयी झाले होते. मात्र, ८ डिसेंबर २०१७ ला त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे येथे पोटनिवडणूक अपेक्षित आहे. मात्र, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद लक्ष्मण गुडधे यांनी या प्रकरणात उच्चन्यायालयात याचिका दाखल केली होती. मतदारसंघात २०११च्या जनगणनेनुसार २१ लाख ९० हजार १० मतदार आहेत. २०१४ मध्ये मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सहा कोटी २८ लाख ८६ हजार रुपये खर्च करण्यात आले. आता पुन्हा निवडणूक झाल्यास त्यापेक्षा अधिक खर्च होईल. शिवाय दीड वर्षांने पुन्हा सर्वसाधारण निवडणूक आहे. त्यामुळे दीड वर्षांत दोनदा निवडणुकीचा खर्च करून जनतेच्या पैशाचा अपव्यय होईल. त्यामुळे पोटनिवडणूक घेण्यात येऊ नये, अशी विनंती गुडधे यांनी त्यांच्या याचिकेद्वारे केली होती.

१ मार्च रोजी झालेल्या सुनावणीत उच्चन्यायालयाने निवडणूक आयोगाने दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्राचे आदेश दिले होते. यानंतर झालेल्या सुनावणीत निवडणूक आयोगाने आणखी काही दिवसांचा वेळ मागितला होता. बुधवारी या प्रकरणी उच्चन्यायालयात सुनावणी झाली. अखेर उच्चन्यायालयाने पोटनिवडणुकीला हिरवा कंदील दाखवला आहे.

पोटनिवडणूक घेऊ नये म्हणून….

दीड वर्षांने पुन्हा सर्वसाधारण निवडणूक आहे. त्यामुळे दीड वर्षांत दोनदा निवडणुकीचा खर्च करून जनतेच्या पैशाचा अपव्यय होईल. त्यामुळे पोटनिवडणूक घेण्यात येऊ नये, अशी विनंती गुडधे यांनी एका याचिकेद्वारे केली होती. त्या याचिकेवर वरील निकाल आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments