Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रपुणेडीएसकेंचा पासपोर्ट जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश

डीएसकेंचा पासपोर्ट जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश

महत्वाचे
1. डी.एस.के यांना कोणत्याही क्षणी अटक
2. न्यायालयाची फसवणूक केली संतप्त सवाल
3. बुलढाणा अर्बन बँकेची खरडपट्टी


मुंबई:  शेकडो गुंतवणूकदारांचे गृहप्रकल्पांच्या नावाखाली पैसे बुडवणारे पुण्याचे प्रसिद्ध उद्योजक डी. एस. कुलकर्णी यांना आज मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दणका दिला. डीएसके यांनी न्यायालयाची फसवणूक केली आहे, असा संताप व्यक्त करतानाच, डीएसकेंचा पासपोर्ट जप्त करण्याचे आदेश न्यायालयानं आज संबंधित यंत्रणांना दिले. तसंच, सर्व विमानतळांना तातडीनं सूचना देण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले. त्यामुळं डीएसकेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या कर्जाचा हवाला देऊन मागील सुनावणीच्या वेळी डीएसके यांनी न्यायालयाकडून मुदत मागून घेतली होती. त्यामुळं त्यांना अटकेपासून संरक्षण देतानाच न्यायालयानं २२ फेब्रुवारीला सुनावणी ठेवली. मात्र, न्यायालयानं आज अचानक सुनावणी घेतली. डीएसके उच्च न्यायालयात हजर होते, तेव्हाच आम्ही जामीन अर्ज रद्द केला असता. मात्र, गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे मिळतील अशी आशा वाटल्यानं आम्ही त्यांना वेळ दिला. मात्र, आता त्यांना एकही संधी देण्याची इच्छा नाही, असं सांगत, त्यांना अटकेपासून दिलेलं संरक्षण आम्ही आज काढून घेतो, असं न्यायालयानं स्पष्ट केलं. डीएसके देशाबाहेर पळून जाऊ नयेत म्हणून सर्व प्रकारची खबरदारी केंद्र सरकारनं घ्यावी, अशा सूचनाही न्यायालयानं केल्या.

बुलडाणा बँकेलाही न्यायालयाकडून तंबी….

डीएसके यांच्या वतीनं न्यायालयात १०० कोटी रुपये भरण्याची हमी देणाऱ्या बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीलाही न्यायालयानं कठोर शब्दांत सुनावलं. ‘कागदपत्रांची पूर्ण छाननी न करताच तुम्ही डीएसकेंना १०० कोटींचे कर्ज द्यायला कसे तयार झालात? तुमच्याकडेही लोकांचाच पैसा आहे हे लक्षात ठेवा,’ अशी तंबीही न्यायालयानं दिली.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments