फरार आरोपीस तब्बल ३२ वर्षानंतर मुंबई पोलिसांकडून अटक

आरोपी विश्वनाथ उर्फ बाळा विठ्ठल पवार (७३) हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील कळवंडवाडी येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच वपोनि निनाद सावंत, आणि पोनि गुन्हे विजय माडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले.

- Advertisement -

Mumbai Police arrested wanted criminal after 32 yearsदरोडा आणि चोरीप्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयाने फरार घोषित केलेल्या आरोपीस तब्बल ३२ वर्षानंतर बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपी विश्वनाथ उर्फ बाळा विठ्ठल पवार (७३) हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील कळवंडवाडी येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत, आणि पोलीस निरीक्षक गुन्हे विजय माडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले.

हे पथक आरोपीचा शोध घेण्यास सिंधुदुर्ग येथे पोहोचले असता आरोपी हा सद्यस्थितीत विरार येथे राहत असल्याची माहिती त्यांना मिळाली.

- Advertisement -

सदर आरोपी भाईंदर ईस्ट ठाणे येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक साळुंके, पोलीस उप निरीक्षक निंबाळकर, पोलीस शिपाई पवार, पोलीस शिपाई गर्जे यांनी सदर पत्त्यावर आरोपीचा शोध घेऊन आरोपीस अटक करण्यात आली.

याबाबत, पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता ते म्हणाले, “सदर खटला हा न्यायालयात १९९० सालापासून चालू होता पण त्यानंतर आरोपी फरार झाला. आरोपीचे शोधकार्य चालू होते पण तब्बल ३२ वर्षानंतर तो पोलिसांच्या हाती लागला. आता यापुढे प्रकरण न्यालयायात प्रविष्ट केले जाईल.”

सदर आरोपीस दिंडोशी सत्र न्यायालय येथे हजर करण्यात येईल.

Web Title: Mumbai Police arrested wanted criminal after 32 years

- Advertisement -