मुंबई: कर्करोग दिनानिमित्त तंबाखूच्या प्रतिकात्मक होळीचे दहन

शाळा, महाविद्यालयांतील युवकांनी व्यसन केल्यास त्याचा परिणाम आरोग्यासह शिक्षणावरही होत आहे महाराष्ट्राची नवी पिढी व्यसनमुक्त आणि आरोग्य संपन्न होण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंबई येथे तंबाखू विरोधी उपक्रम आयोजित करण्यात आला.

- Advertisement -

World Cancer Day
Symbolic Holi Burning of Tabaco जागतिक कर्करोग दिनानिमित्त ४ फेब्रुवारी २०२३ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंबई राष्ट्रीय सेवा योजना, आरोग्य सेवा आयुक्तालय, राज्य तंबाखू नियंत्रण कक्ष आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखूच्या प्रतिकात्मक होळीचे दहन करण्यात आले होते. यावेळी नशाबंदी मंडळाचे कार्यक्रम समन्वयक श्री मिलिंद पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

देशात कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात लाखो कर्करोग पिडित रुग्ण आढळत असतानाच.त्यात दरवर्षी हजारो नवीन रूग्णांची भर पडत आहे. युवकांमध्ये कर्करोगाच्या प्रमाणात दरवर्षी मोठी वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. .

शाळा, महाविद्यालयांतील युवकांनी व्यसन केल्यास त्याचा परिणाम आरोग्यासह शिक्षणावरही होत आहे महाराष्ट्राची नवी पिढी व्यसनमुक्त आणि आरोग्य संपन्न होण्यासाठी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, आरोग्य सेवा आयुक्तालय आणि राज्य तंबाखू नियंत्रण कक्ष यांच्या प्रयत्नातून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंबई येथे जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून तंबाखू विरोधी उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे पालघर जिल्हा संघटक मिलिंद पाटील यांनी तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम व व्यसनमुक्ती वर मार्गदर्शन केले. तर रविंद्र गमरे नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे मुंबई शहर जिल्हा संघटक यांनी तंबाखु व्यसन मुक्तीची शपथ दिली. तंबाखुच्या प्रतीकात्मक होळीचे दहन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

- Advertisement -

सदर कार्यक्रमात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंबई ११ चे उपसंचालक राजन संखे, उपप्राचार्य अभय तायडे, राष्ट्रीय सेवा योजना चे कार्यक्रम अधिकारी प्रा. सुनिल दहिवलकर, संस्थेतील कर्मचारी व युवक उपस्थित होते.

 

Web Title: Mumbai: Symbolic Holi burning of Tabaco on the occasion of World Cancer Day

- Advertisement -