आनंदवार्ता : ‘मुंबई ते अहमदाबाद’ दुसरी ‘तेजस’अशी धावणार!

- Advertisement -

नवी दिल्ली : प्रवाशांच्या सेवेसाठी भारतीय रेल्वेने कात टाकली आहे. देशातील पहिली खासगी ट्रेन दिल्ली ते लखनऊ दरम्यान सुरू झाल्यानंतर आता मुंबई- अहमदाबाद ही दुसरी तेजस एक्स्प्रेस लवकरच धावणार आहे. जानेवारी २०२० पासून ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेसाठी तयार असणार आहे. दुसरी खासगी तत्त्वारील तेजस एक्स्प्रेस जानेवारी २०२० मध्ये धावणार आहे.

देशातील पहिली खासगी रेल्वे तेजस एक्स्प्रेस दिल्ली-लखनऊ मार्गावर ऑक्टोबर २०१९ मध्ये धावली. त्यानंतर खासगी एक्सप्रेस चालविण्यासाठी दुसरा मार्ग म्हणून मुंबई ते अहमदाबाद मार्ग निवडण्यात आला. नोव्हेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून ही ट्रेन चालविण्यात येणार होती. परंतु, आता त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी)च्या वतीने या दोन्ही खासगी एक्स्प्रेस चालविण्यात येतील. इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी) च्या वतीने या दोन्ही खासगी एक्स्प्रेस चालविण्यात येतील. आठवड्यातील गुरुवार वगळता इतर सर्व दिवशी तेजस एक्स्प्रेस धावेल. मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावणारी तेजस एक्स्प्रेस केवळ सुरत आणि वडोदरा स्थानकात थांबा घेणार आहे.

- Advertisement -

काय मिळणार सुविधा….

यामध्ये प्रवाशांसाठी जागतिक दर्जाच्या सुखसोयी व आरामदायी व्यवस्था आहे. तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना वाचनासाठी वैयक्तिक रीडिंग लाइट, मोफत वायफाय, प्रवाशांच्या सुविधेसाठी कर्मचारी, बायोटॉयलेट, स्वयंचलित दरवाजे, आरामदायी जागा आदी सुविधा आहेत.

वेळापत्रकावर एक नजर…

मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसची पहिली ट्रेन सकाळी ६.४० वाजता अहमदाबादहून सुटेल. ती दुपारी १.१० वाजता मुंबई सेंट्रल येथे पोहोचेल.

मुंबई सेंट्रलहून दुपारी ३.४० वाजता सुटेल. ती अहमदाबाद येथे रात्री ९.५५ वाजता पोहोचेल.

मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेसमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मात्र प्रवाशांना नवीन वर्षापर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.

 

- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here