होम महाराष्ट्र मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुक, ७ ला मतदान ९ मतमोजणी?

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुक, ७ ला मतदान ९ मतमोजणी?

9
0
शेयर

मुंबई – विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सिनेट निवडणुकीसाठीचे मतदान येत्या ७ फेब्रुवारीला पार पडणार असून मतमोजणी ९ फेब्रुवारीला होणार आहे.

१० प्राचार्य, ६ व्यवस्थापन प्रतिनिधी, ३ विद्यापीठ अध्यापक तसेच विविध अभ्यास मंडळांवर प्रत्येकी ३ महाविद्यालयीन विभाग प्रमुखांच्या जागांसाठी हा निवडणूक कार्यक्रम विद्यापीठाने जाहीर केला आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ अंतर्गत या निवडणुका होणार आहेत.
या अधिकार मंडळाच्या अधिसुचनेनुसार, २१ जानेवारीपर्यंत उमेदवारांना त्यांचा अर्ज सादर करता येणार असून या उमेदवारी अर्जाची छाननी २२ जानेवारीला होणार आहे. उमेदवारी अर्जाच्या वैधतेबाबत कुलगुरूंकडे २३ जानेवारीपर्यंत अपील करता येणार आहे. तर, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २५ जानेवारी निश्चित करण्यात आलेली आहे.
उमेदवारांची अंतिम यादी तसेच मतदान केंद्राची नावे २६ जानेवारीला विद्यापीठाच्या संकेतस्थळावर तसेच www.musenate.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली जाणार असल्याची माहिती कुलसचिव(प्र) तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिनेश कांबळे यांनी दिली आहे.