होम क्रीडा बेलापूर येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत स्टारफिशने पटकाविली 16 सुवर्णपदके

बेलापूर येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत स्टारफिशने पटकाविली 16 सुवर्णपदके

1
0

ठाणे, ता. 19 ः आज (19.01.2019) नवीमुंबई बेलापूर येथे वायएमसीएने (YMCA) आयोजित केलेल्या 6 व्या आंतरशालेय जलतरण स्पर्धेत स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या 9 जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करीत सुवर्ण,रौप्य व ब्राँझ पदकांवर आपली नावे कोरली. संपूर्ण स्पर्धेत स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनने 16 सुवर्ण 9 रौप्य व 3 कांस्यपदके पटकाविली.

    या स्पर्धेत 12 वर्षाखालील गटात सवर आकुस्कर हिने फ्री स्टाईल, बटरफ्लाय, बॉक स्ट्रोक, ब्रेस्ट स्ट्रोक या चारही प्रकारात एकूण 4 सुवर्णपदक व वैयक्तिक 1 सुवर्णपदक पटकाविले. 10 वर्षाखालील गटात आदित्य घागयाने 2 सुवर्ण व 1 कांस्यपदक, ईदांत चतुर्वेदी याने 1 सुवर्णपदक व 1 कांस्यपदक, रोहनु आंबुरे 1 सुवर्ण व 2 रौप्य व 1 कांस्यपदक पटकाविले.  आर्य गडे हिने 1 सुवर्ण व 2 रौप्यदक, 8 वर्षाखालील विहान चतुर्वेदी याने चारहीप्रकारात एकूण 4 सुवर्णपदक व वैयक्तिक 1 सुवर्णपदक, आयुषी आखाडे हिने 1 रौप्य व 1 कांस्यपदक, 6 वर्षाखालील गटात फ्रेया शहा हिने 1 सुवर्ण व 2 रौप्यपदक पटकाविली. तर या स्पर्धेत रुद्र निसार, वरद कोळी, यशभोसले, विराट ठक्कर, मानस प्रधान, सिध्दांत पोळ, ईशा शिंदे आदी जलतरणपटू सहभागी झाले होते. या सर्व जलतरणपटूंना प्रशिक्षक अतुल पुरंदरे व कैलास आखाडे यांचे मार्गदर्शन लाभले.