महिला बालविकास खात्या तर्फे “बेटी बचाव बेटी पढाव” अभियान

- Advertisement -

महिला बालविकास खात्याने नुकतेच “बेटी बचाव बेटी पढाव” अभियान मुंबई उपनगरांमध्ये राबवले.
हे अभियान 21 ते 26 जानेवारी दरम्यान मुंबईच्या विविध उपनगरांमध्ये राबवले गेले. या आंदोलनाचा भाग म्हणून “बेटी बचाव बेटी पढाव” ही संकल्पना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध कार्यक्रम राबविले गेले.
यात अंगणवाडी सेविकांनी देखील विविध कार्यक्रमांमध्ये आपले योगदान दिले. “बेटी पढाव बेटी बचाव” अंतर्गत , घोषणा दिल्या, कँपेनिंग केले. पथ नाट्य केली गेलीत. बांदर्यापासून सुरवात होऊन गोराई, जोगेश्वरी , गोरेगाव पर्यंत हे अभियान राबवले गेले.
खात्यातील कर्मचाऱ्यांना अंगणवाडी महिला कर्मचार्यांचा भरपूर सहयोग लाभला . सर्वांनी मेहनत घेऊन अभियान यशस्वी केले. सर्वच ठिकाणी महिलांचा भरपूर प्रतिसाद लाभला.
राणी लक्ष्मी बाई, भारत माता अश्या वेगवेगळ्या वेशभूषेत घोषणा केल्या गेल्या .
सावित्री बावरे, रज्जू शर्मा, त्रिवेणी पाटील यांनी अथक परिश्रम घेऊन अभियान यशस्वी केले.

 

- Advertisement -

- Advertisement -