होम महाराष्ट्र मुंबई मुल्ला बाग टीमटी बसडेपोचे मराठा क्रांती मोर्चाने केले 

मुल्ला बाग टीमटी बसडेपोचे मराठा क्रांती मोर्चाने केले 

9
0

छत्रपती शिवाजी महाराज टीएमटी बसडेपो नामकरण

ठाणे, दि. 4

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करीत राज्यात व विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तेत आलेल्या शिवसेनेला मात्र त्यांच्या नावाचा ठाण्यात विसर पडला आहे. गेली दोन वर्षे पाठपुरावा करून सुद्धा मानपाडा येथील मुल्लाबाग बसडेपोचे छत्रपती शिवाजी महाराज टीएमटी बसडेपो करण्यास सत्ताधारी शिवसेना टाळाटाळ करीत आहे. आज अखेर मराठी क्रांती मोर्चाचे समन्वयक, सकल मराठा सार्वजनिक शिवउत्सव मंडळाचे अध्यक्ष रमेश आंब्रे यांनी आाढमक होतकार्यकर्त्यांसमवेत बसडेपोत जाऊन छत्रपती शिवाजी महाराज टीएमटी बसडेपो असे नामकरण केले.

मुल्ला बाग येथे नव्याने टीएमटी बसडेपो उभारण्यात आला आहे. या डेपोला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याची विनंती रमेश आंब्रे हे गेल्या दोन वर्षांपासून करत आहेत. त्याबाबत पालिका प्रशासन, सत्ताधारी शिवसेनेचे पदाधिकारी, नेते, पालकमंत्री यांना पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र अद्याप त्याबाबत कोणतीच ठोस पावले उचतत नसल्याने रमेश आंब्रे यांनी मुल्ला बाग टीएमटी बसडेपोवर धडक देत सदर डेपोचे छत्रपती शिवाजी महाराज असे नामकरण केले. यावेळी  छत्रपती शिवाजीमहाराज की जय च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

याबाबत रमेश आंब्रे म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून आम्ही शिवाजी महाराजांचे नाव यावे यासाठी पाठपुरावा करत आहोत. माझी  पत्नी नगरसेविका स्नेहा आंब्रे यांनीही पालिकेकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र याला कोणताच सकारात्मक प्रतिसादसत्ताधारी आणि त्यांचे नेते देत नाहीत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव आमच्या प्रभागातील चौकाला देण्याचा प्रस्ताव पालिकेत मंजूर झाला आहे मात्र आता दिड वर्ष झाली तरी चौकाला नाव दिले गेले नाही. आम्ही नामकरण केले आहे. एखाद्यानगरसेवकाच्या निधन झालेल्या नातेवाईकाचे नाव लगेच रस्ता किंवा चौकाला लागते. काही दिवसांपूर्वी आमदारांच्या वडीलांचे नाव उपवन येथील डेपो ला दिले आहे. तर  माजी महापौरांच्या वडीलांचे नाव तुळशीधाम बगीच्याला दिले आहे. मात्र राष्ट्रपुरुषांचेनाव लागण्यास विलंब होतो. अशा मनोवृत्तीचा आम्ही निषेध करतो.