होम महाराष्ट्र मुंबई म. रा. कंत्राटी कर्मचारी महासंघाचा इम्पॅक्ट

म. रा. कंत्राटी कर्मचारी महासंघाचा इम्पॅक्ट

6
0

# जीएसटी भवन मधील कंत्राटी कर्मचारी यांना मिळाला मागील 3 महिन्याचा पगार

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या शिष्टमंडळाने जीएसटी आयुक्त, जीएसटी विशेष आयुक्त तथा वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली असता जीएसटी भवन मधील कंत्राटी कर्मचारी यांना मागील 3 महिन्याचा पगार नुकताच देण्यात आला आहे.

महासंघाचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांच्या नेतृत्वाखाली करिश्मा श्रीधनकार, प्रिती चव्हाण, प्रशांत झावरे, सुकन्या कीर या शिष्टमंडळाने भेट घेतली होती. दरम्यान वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सदर प्रकरणाची गंभीर दाखल घेत जीएसटी आयुक्त यांना कंत्राटी कर्मचारी यांचे पगार तात्काळ देण्याचे सूचना दिल्या होत्या. जीएसटी आयुक्त यांनी ठेकेदाराला कर्मचाऱ्यांचे पगार तात्काळ देण्याचे लेखी आदेश दिले. परंतू, ठेकेदाराने 80 % पगार देण्याचे आश्वासहीत केला असता कर्मचारी यांनी दि. 29 जानेवारी रोजी काम बंद आंदोलन केला असता. नुकताच 100 % पगार  देण्यात आला आहे. यावेळी जीएसटी भवन मधील कर्मचारी यांनी महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांचे विशेष आभार व्यक्त केले आहे.