Placeholder canvas
Wednesday, April 17, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चन्द्रशेखर टिळक यांना यावर्षीचा  डॉ . पारनेरकर अर्थशास्त्र पुरस्कार जाहीर.

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चन्द्रशेखर टिळक यांना यावर्षीचा  डॉ . पारनेरकर अर्थशास्त्र पुरस्कार जाहीर.

पूर्णवाद परिवार सेवा मंडळ आणि पूर्णवाद लाईफ मँनेजमेंट इन्स्टिट्यूट यांच्यातर्फे दरवर्षी दिला जाणारा डॉ. पारनेरकर अर्थशास्त्र पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ , प्रसिद्ध वक्ते आणि लेखक श्री . चन्द्रशेखर टिळक यांना जाहीर झाला आहे.
आर्थिक क्षेत्रातील प्रभावी , समाजपयोगी आणि सातत्यपूर्ण कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो . हे पुरस्काराचे दहावे वर्ष आहे . अच्युत गोडबोले , डॉ . अजित रानडे , डॉ . श्रीनिवास खांदेवाले , डॉ . विनायक गोविलकर , डॉ . दीपक मोहन्ति , डॉ . सुलभा ब्रम्ही यांच्यासारखे मान्यवर आधीच्या वर्षातले या पुरस्काराचे मानकरी आहेत .
श्री . चन्द्रशेखर टिळक हे एनएसडीएल मधे कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असून त्यांची आजपर्यंत १६ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत . केंद्रीय अर्थसंकल्पाचा प्रभावी भाष्यकार म्हणून त्यांचे नाव साऱ्या देशभर गाजत असते . अर्थकारण व गुंतवणूक या विषयांशी संबंधित सुमारे ३००० भाषणे त्यांची झाली असून सुमारे २००० लेख प्रसिद्ध झाले आहेत .
 शनिवार , २ फेब्रुवारी २०१९ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता सीकेपी हॉल , खारकर आळी , ठाणे ( पश्चिम ) येथे यावर्षीचा डॉ . पारनेरकर अर्थशास्त्र पुरस्कार श्री . चन्द्रशेखर टिळक यांना प्रसिद्ध उद्योजक श्री . रवींद्र प्रभूदेसाई यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल .
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments