Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईनवी मुंबई करानी अनुभवला स्टंट बाईक्सचा थरार

नवी मुंबई करानी अनुभवला स्टंट बाईक्सचा थरार

प्रतिनिधी- जागतिक दर्जाचा मोटोक्रॉस खेळाडू रशियाचा अलेक्सी कोल्सेनिकोव्ह याने त्याच्या चित्तथरारक बाईक स्टंटनी उपस्थितांची मने जिंकून घेतली. नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्पोर्टस अकॅडमीमध्ये अलेक्सी कोल्सेनिकोव्ह आला होता. रेडबुल अथलेट अलेक्सी कोल्सेनिकोव्ह याच्या कसरती पाहायला नवी मुंबईतील नागरीक तसेच डि.वाय. पाटील शैक्षणिक संकुलातील शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.

जगातील प्रमुख २० बाईक स्टंटस्वारामध्ये अलेक्सी कोल्सेनिकोव्हचा समावेश आहे. अलेक्सी हा रॉबी मॅडीसन, टॉम पेजेस, मार्टीन कोरीन, रॅडेक बिलेक, ज्युलिअन वान्स्टीप्पेन हे देखील २ फेब्रुवारी रोजी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे होत असलेल्या रेड बुल एफएमएक्स जाम बाईक स्टंटमध्ये सहभागी होणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments