Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमुख्यमंत्री शिशु स्वागत किट योजनेचा महिला बालविकासमंत्री पंकज मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ

मुख्यमंत्री शिशु स्वागत किट योजनेचा महिला बालविकासमंत्री पंकज मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ

प्रजासत्ताक दिनापासून राज्यात राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री शिशु स्वागत किट योजनेचा महिला आणि बालविकासमंत्री यांच्या हस्ते आज शुभारंभ झाला. बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात जन्मणाऱ्या नवजात बालकांना आता राज्य शासनामार्फत  मुख्यमंत्री शिशु स्वागत किट मोफत मिळणार आहे.

महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे  यांच्या हस्ते गरोदर महिला,स्तनदा मातांना आज मुख्यमंत्री शिशु स्वागत किटचे वाटप करण्यात आले. सचिव विनिता सिंगल, आयुक्त इंद्रा मालो ह्यांच्या उपस्थितीत हे वाटप केले गेले. यापुढे  शासकीय रुग्णालयात कोणत्याही महिलेच्या पहिल्या प्रसुतीच्यावेळी मुलांच्या संगोपनासाठी हे किट  मोफत मिळणार आहे.

बालमृत्यू, कुपोषण रोखण्याबरोबरच बालसंगोपनाच्या दृष्टीने #मुख्यमंत्री_शिशु_स्वागत_किट योजना महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास  महिला आणि बालविकास मंत्री पंकज मुंडे  यांनी व्यक्त केला.

@Pankajamunde

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments