Friday, March 29, 2024
Homeट्रेंडिंगवृत्तपत्र छायाचित्रकार दीपक कुरकुंडे यांचा अहिल्यादेवी पुरस्काराने गौरव 

वृत्तपत्र छायाचित्रकार दीपक कुरकुंडे यांचा अहिल्यादेवी पुरस्काराने गौरव 

 
ठाणे,ता.21 प्रतिनिधी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघ,मुंबई यांच्यावतीने पत्रकार तथा वृत्तपत्र छायाचित्रकार दीपक कुरकुंडे,अध्यक्ष,धनगर प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्य यांना पत्रकारिता क्षेत्रात करत असलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल अहिल्यादिवी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.कुरकुंडे हे सकल धनगर समाजासाठीही उल्लेखनीय कार्य सातत्याने करीत आहेत. 
 पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघ,मुंबई यांच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी व समाजरत्न दिवंगत शिवाजीराव (बापू) शेंडगे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विक्रोळी येथील कामगार कल्याण भवनमध्ये पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.या कार्यक्रमात राजकीय, सामाजिक,व्यावसायिक,शैक्षणिक,क्रीडा,पत्रकारिता आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या धनगर समाजातील समाजबांधवांचा “अहिल्यादेवी पुरस्कार” पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. धनगर प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्य या संस्थेचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे हे धनगर समाजासाठी करत असलेल्या कार्याची तसेच,पत्रकारिता क्षेत्रात करत असलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना “अहिल्यादेवी पुरस्काराने गौरवण्यात आले.यावेळी अहिल्यादेवींचे वंशज भूषणसिंह होळकर, प्रशासकीय अधिकारी वैभवकुमार आलदर (आयपीएस),सहाय्यक आयुक्त सचिन वाघमोडे,संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण व्हटकर,यशवंत सैनिक राजू जांगळे,संस्थेचे सचिव मधुकर गडदे आदी मान्यवर उपस्थित होते.
 गेली  १८ वर्षे दीपक कुरकुंडे विविध वर्तमानपत्रात छायाचित्रकार या माध्यमातून ठाणे शहरात पत्रकारिता करीत आहेत.आपल्या बहुआयामी छयाचित्राच्या माध्यमातून त्यांनी अनेक समस्यांना वाचा फोडण्याचे काम केले असून अनेक पिडीताना न्याय मिळवून दिला आहे.तसेच,ज्या धनगर समाजात जन्मलो त्याचे काही देणे लागतो या हेतूने धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या माध्यमातून गेली 8 वर्ष धनगर समाजाच्या विकासासाठी झटत आहेत.या माध्यमातून त्यांनी ठाणे शहरात धनगर समाजासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत.धनगर समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजबांधवांना धनगर रत्न पुरस्कार,समाजातील शिक्षकांचा शिक्षक दिनी सन्मान,महिला दिनी पोलीस दलातील समाजाच्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान,वकील दिनानिमित्त समाजातील वकिलांचा सन्मान,समाजातील १०,१२ वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार,अहिल्यादेवी होळकर जयंती,मल्हारराव जयंती,यशवंतराव जयंती निमित्त विविध सामाजिक कार्यक्रम,असे कार्यक्रम त्यांच्या संकल्पनेतून करण्यात आले आहेत.या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments