Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईविमानाने मुंबईत येत आहात? आता व्हावा लागेल 14 दिवसांसाठी क्वारंटाइन

विमानाने मुंबईत येत आहात? आता व्हावा लागेल 14 दिवसांसाठी क्वारंटाइन

Mumbai airport, domestic airport, bmc, quarantine, 14 days, travelling, mumbaiमुंबईकरांना परराज्यातून परत आल्यास १४ दिवस गृह अलगीकरणात राहावं लागणार आहे. कोणत्याही राज्यातून मुंबईत येणाऱ्या लोकांना परत आल्यानंतर 14 दिवस घरातच राहावं लागणार आहे. मुंबई महापालिकेने हे नवे आदेश काढले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून हे आदेश काढण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

मुंबईतल्या रुग्णांची वाढती संख्या आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. ज्या शासकीय अधिकाऱ्यांना मुंबईत आल्यानंतर कामानिमित्त बाहेर पडायचं असल्यास त्यांनासुद्धा परवानगी घ्यावी लागणार आहे. कोरोनाचा प्रसार आणि धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचंही मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या संकटामुळे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर लोक आपल्या गावी गेले आहेत. आता काही लोक पुन्हा परत येत असल्याने महापालिकेने ही नियमावली प्रसिद्ध केली आहे. कोरोना व्हायरस विरुद्ध खबरदारी म्हणून मुंबईत येणाऱ्या सर्व प्रवाशांना १४ दिवस गृह अलगीकरण करणे अनिवार्य आहे. शासकीय अधिकाऱ्यांना यातून सूट आवश्यक असल्यास amc.projects@mcgm.gov.in वर कामकाजाच्या तपशिलासह दोन दिवस अगोदर अर्ज करणे आवश्यक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments