Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईक्रिकेटचे असो की, राजकीय मैदान मीच जिंकणार, परिवर्तन घडवणार - धनंजय मुंडेंची...

क्रिकेटचे असो की, राजकीय मैदान मीच जिंकणार, परिवर्तन घडवणार – धनंजय मुंडेंची क्रिकेटच्या मैदानावर जोरदार फटकेबाजी

परळी वै.22………… मी आज क्रिकेटच्या मैदानावर उतरलो आहे, मैदान कोणतेही असो, मग ते क्रिकेटचे असो की राजकीय मैदान परळीची जनता, परळीचे प्रेक्षक नेहमीच माझ्या पाठीशी असल्यामुळे कोणतेही मैदान मीच जिंकणार, परिवर्तन घडवणारच… अशा आत्मविश्‍वासपुर्ण शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यंानी आज परळीच्या क्रिकेटच्या मैदानावर जोरदार राजकीय फटकेबाजी केली. उद्घाटनाच्या क्रिकेट सामन्यात स्वतः मैदानात बॅट आणि बॉल घेऊन उतरत आपल्यातील क्रिकेट पटुचेही प्रदर्शन केले. प्रेक्षकांचा अलोट प्रतिसाद हे या उद्घाटन सामन्याचे वैशिष्ठ्य ठरले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने परळीत डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी बोलत होते. कुणाची विकेट घेण्यासाठी कधी आणि कसा बॉल टाकायचा हे आम्हाला चांगलेच माहिती आहे. यावेळी पहिल्याच बॉलवर विकेट काढण्याचा आपला निर्धार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून मैदानावर उतरली आहे, महाराष्ट्र आणि देशात चषक राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीलाच मिळणार, परिवर्तन घडवणारच असा विश्‍वासही त्यांनी बोलुन दाखवला.
         या कार्यक्रमास माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके, रा.कॉं. जिल्हाध्यक्ष बजरंगबप्पा सोनवणे, माजी आ.पृथ्वीराज साठे, जि.प.सदस्य बालासाहेब आजबे, महिला जिल्हाध्यक्ष रेखाताई फड, जि.प.सदस्य सतिश शिंदे, कृ.उ.बा.सभापती अशोकराव डक, माजी समाजकल्याण सभापती महेंद्र गर्जे, रा.यु.कॉं.प्रदेश उपाध्यक्ष महेबुब शेख, न.प.उपनगराध्यक्ष अय्युब भैय्या पठाण, शहराध्यक्ष भैय्या धर्माधिकारी, तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ पं.स.उपसभापती पिंटु मुंडे, निळकंठ चाटे, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष रणजित लोमटे, शिवहार भताने, पं.स.उपसभापती तानाजी देशमुख, मिलिंद बाबते, जि.प.सदस्य डॉ.मधुकरराव आघाव, माऊली गडदे, न.प.गटनेते वाल्मिकअण्णा कराड,  मोहनराव सोळंके, रा.यु.कॉं.प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे, विलास सोनवणे, बबन लोमटे, गणेश देशमुख, सर्व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री.प्रकाशदादा सोळंके यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. संयोजक तथा जि.प.सदस्य अजय मुंडे यांनी स्पर्धा आयोजना मागची भूमिका सांगितली व या स्पर्धेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रदिप खाडे, पापा मुंडे, अविनाश गवळी, शेख मुसा, शंकर कापसे, अजय जोशी, बाळासाहेब वाघ, सुरेश गित्ते, प्रणव परळीकर, विष्णु गित्ते, अनंत इंगळे, हजीब बाबु, रवि आघाव, सुरेश मुंडे, प्रितम जाधव, अमित केंद्रे आदींसह असंख्य कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
सुरेश रैनांचा संदेश
या स्पर्धेच्या उद्घाटनाला भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटु सुरेश रैना येणार होता, मात्र विमान चुकल्यामुळे तो येऊ शकला नाही, मात्र मोबाईल द्वारे त्याने स्पर्धेला आणि सर्व खेळाडुंना आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. बक्षिस वितरणाला सुरेश रैना आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हे येतील अशी घोषणा करताच उपस्थित प्रेक्षकांनी त्याला जोरदार प्रतिसाद दिला. या उद्घाटन कार्यक्रमाला अलोट गर्दी उसळली होती.
आगामी एक महिना या स्पर्धा चालणार असून, त्यात शहर व ग्रामीण भागातील एकुण 188 संघांनी भाग घेतला आहे. या स्पर्धेचे युट्युब चॅनेलद्वारे थेट प्रेक्षपण केल्या जात आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments